Hero Karizma ही बाईक २००३ मध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली होती.त्यावेळी हिरो आणि जपानी दुचाकी उत्पादक कंपनी पार्टनर्स होते.आता हिरो पुन्हा एकदाHero Karizma लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Hero MotoCorp ही देशातील आघाडीची दुचाकी व्यवसायातील कंपनी आहे. ही कंपनी लवकरच नवीन बाईक लॉन्च करणार आहे.कंपनीने या नवीन बाईकचा टीझर लॉन्च केला आहे.टीझरनुसार ही बाईक २९ ऑगस्ट २०२३ ला लॉन्च होणार आहे.या बाईकच्या नावाशिवाय कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.एका अहवालानुसार,हिरो पुन्हा एकदा Hero Karizma लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे.कंपनीने अलीकडेच डिलरशीप मीटमध्ये ही बाईक प्रदर्शित केली.
Hero karizma या बाईकला पहिल्यांदा २००३ मध्ये लॉन्च करण्यात आले होते.यावेळी Hero आणि Honda भारतात एकत्र व्यवसाय करत होते. 2006 मध्ये पुन्हा एकदा या बाईकचे अपडेट केले गेले. नंतर 2007 मध्ये, कंपनीने Karizma R लॉन्च करण्यात आली. तर सप्टेंबर 2009 मध्ये, कंपनीने Karizma ZMR लॉन्च केली. या बाईक्स इंधन इंजेक्टेड इंजिनसह लॉन्च केल्या होत्या.2019 मध्ये, मागणीच्या अभावामुळे या बाईकचे उत्पादन थांबवण्यात आले.
सन 2003 मध्ये, जेव्हा बजाज ऑटोने 200 सीसी सेगमेंटमध्ये पल्सर रेंजसह बाजारात बाईक लॉन्च केली होती, तेव्हा कंपनीने 223cc एअर-कूल्ड इंजिनसह Karizma लॉन्च केली. हे इंजिन 20PS पॉवर आणि 19Nm टॉर्क जनरेट करत असे. नवीन मॉडेलबाबात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. कदाचित नवीन अपडेट बाईक 210cc लिक्वीड कूल्ड इंजिनसह लॉन्च केली जाईल.
1. नवीन Hero Karizma ची काही खास वैशिष्ट्ये
या बाईकमध्ये कदाचित 210cc लिक्विड कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते. या बाईकला संपूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येईल.त्याच्या पॉवर आउटपुटबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, हे इंजिन 25 बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सही असेल.असा अंदाच वर्तवला जात आहे.
2. नवीन Hero Karizma स्टायलिंग
Karizma Z\XMR ला स्लीक हेडलॅम्प, दोन-पीस सीट, ड्युअल-टोन इंधन टॅंक आणि अरुंद टेल सेक्शनसह स्पोर्टी फेअरिंग मिळते. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि इतर वैशिष्ट्यांसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळण्याची शक्यता आहे. Karishma XMR दोन्ही बाजूंना स्टायलिश अलॉय व्हीलसह डिस्क ब्रेक मिळतील.यात अपसाइड-डाउन फॉक्सऐवजी पूढील बाजूस पारंपारिक टेलिस्कोपिक सस्पेंशन मिळू शकते. तर मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन दिले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.