Best Way To Morning Walk Saam tv
लाईफस्टाईल

Best Way To Morning Walk : मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करावा की नाही? वॉकची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Morning Walk Tips : आपल्या आरोग्यासाठी डॉक्टर आपल्याला मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला देतात. सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. मॉर्निंग वॉक हा अनेक आजारांवर औषध आहे असे म्हटले तर वावगे ठरणारं नाही.

मॉर्निंग वॉकमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. त्याचबरोबर रक्तातील साखर आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. मॉर्निंग वॉकमुळे दिवसभर ऊर्जा मिळते. मॉर्निंग वॉकमुळे जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो, असे अनेक अभ्यासांमध्ये म्हटले आहे.

मॉर्निंग वॉक (morning walk) बहुतेक लोक करत असले तरी त्यांना ते करण्याची योग्य पद्धत माहित नाही. मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करावा की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्याच वेळी, मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी पाणी (Walk) प्यावे की नाही हे अनेकांना माहिती नसते. जर तुम्हाला मॉर्निंग वॉकचा योग्य मार्ग कोणता आहे हे माहित नसेल तर येथे तुम्ही ते सहज जाणून घेऊ शकता.

1. मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, जर तुम्ही मॉर्निंग वॉक करत असाल तर मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता केल्याने वजन कमी (Weight Loss) करण्यात किती मदत होईल हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. संशोधनात असा दावा केला गेला आहे की जर तुम्ही मॉर्निंग वॉक दरम्यान नाश्ता केला नाही किंवा रिकाम्या पोटी मॉर्निंग वॉकला गेलात तर जास्त कॅलरीज बर्न होतील आणि शरीरातून जास्त चरबी वितळी जाईल.

पण दुसर्‍या एका संशोधनात असे म्हटले आहे की मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करायचा की नाही हे तुमचे शरीर मॉर्निंग वॉकसाठी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. सकाळी न्याहारी न करता वॉर्क केला तर थकवा येतो, खूप त्रास होतो, तेव्हा हलका नाश्ता करणं गरजेचं आहे. पण जर नाश्ता न केल्याने तुमच्या पोटावर परिणाम होत नसेल तर तुम्ही ते वगळू शकता. मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी हलका नाश्ता करणे चांगले. यामध्ये तुम्ही केळी किंवा काही फळे खाऊ शकता. जड नाश्ता करू नका. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मॉर्निंग वॉकवरून परत येता तेव्हा जड नाश्ता करा. यासोबतच पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे.

मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत

1. योग्य कपडे निवडा-

मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी त्वचेतून घाम शोषून घेणारे कपडे घाला. हलके सुती कपडे घाला जेणेकरून त्वचेला ऍलर्जी होणार नाही. मॉर्निंग वॉक करताना मोजे न घालणे चांगले.

2. हिरवळ असलेल्या ठिकाणी जा-

सकाळी अशी जागा निवडा जिथे जास्त हिरवळ आणि झाडे असतील. फक्त चालू नका थोडी धावपळ करा, शेजाऱ्यांशीही बोला. योग, ध्यान केले तर उत्तम.

3. संवाद-

सकाळी फिरताना आजूबाजूच्या लोकांशी संवाद वाढवा. एकमेकांशी बोलण्यात सकारात्मकता निर्माण होईल, यामुळे आनंदी हार्मोन्स वाढतात आणि तुम्ही दिवसभर आनंदी राहाल.

4. सतत पाणी प्या -

मॉर्निंग वॉक करताना सतत पाणी प्या. यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत राहील.

5. वॉर्म अप-

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी पहिली 5 मिनिटे जमिनीवर वॉर्म अप करा. वॉर्म अप केल्याने चालण्यासाठी शरीरात ऊर्जा राहील आणि तुमचे शरीर तयार होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT