Crying
Crying Saam Tv
लाईफस्टाईल

Advantages Of Crying: होय! अश्रू गाळने चांगले! 'हे' आहेत रडण्याचे उत्तम फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : असं म्हटलं जातं की रडणं ही चांगली गोष्ट नाही, पण आज आम्ही तुम्हाला सांगतो की अश्रू तितकेही वाईट नसतात. आता तुम्ही म्हणाल कसे? होय ! विज्ञान सांगते की रडणे वाईट नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण रडण्याचे स्वतःचे फायदे देखील आहेत. रडण्याने आपल्याला किती फायदे आहेत ते जाणून घेऊया.

हे आहे अश्रूंचे काम;

सर्वप्रथम अश्रूंचे काय काम आहे ते जाणून घेऊयात- मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, अश्रू तीन प्रकारे बाहेर पडतात.

प्रथम- डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते.

दुसरे- जेव्हा हवा, धूळ आणि धूर डोळ्यात जातो.

तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे- माणूस भावनिक होतो तेव्हा, दु:खी होतो तेव्हा, दुखापत होते तेव्हा.

Crying

तणाव पातळी कमी होते;

असे अनेक लोक आहेत जे आले की अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करतात कारण यामुळे त्यांना वाटते की, दुर्बलतेचे लक्षण आहे. पण विज्ञान स्वतः सांगते की त्याचे अनेक फायदे आहेत. संशोधनातही याची पुष्टी झाली आहे. उदाहरणार्थ, रडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला खूप आराम (Relax) वाटतो. एवढेच नाही तर रडल्याने आपली तणावाची पातळी देखील कमी होते.

रडल्यानंतर मूड चांगला होतो;

एका संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा शरीरात अशी रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे व्यक्तीला बरे वाटते. यामुळे आपला मूड चांगला होतो, आपल्याला हलके वाटते. म्हणून, रडल्यानंतर, आपल्या वेदना कमी झाल्या सारख्या वाटतात. तसेच आपली झोप देखील चांगली होते आणि आपल्याला बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनचा धोका सुद्धा कमी होतो.

Crying

बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो;

2011 मध्ये या विषयावर एक संशोधन करण्यात आले होते, त्या संशोधनात म्हटले आहे की, अश्रूंमध्ये एक विशेष प्रकारचे रसायन लाइसोसोम आढळते. या रसायनात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते. त्यामुळे जेव्हा अश्रू बाहेर येतात तेव्हा त्यांना वाहू द्या. असे केल्याने चेहऱ्यावरील त्वचेवर बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच यामुळे शारीरिक आणि मानसिक स्तरावर तुम्हाला अनेक फायदे होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

SCROLL FOR NEXT