High Blood Pressure google
लाईफस्टाईल

High Blood Pressure : उच्च रक्तदाब असेल तर शरीरात नेमके काय काय बदल होतात? जाणून घ्या

Stroke Prevention: उच्च रक्तदाब हा शांतपणे शरीरातील अवयवांवर परिणाम करणारा आजार आहे. हृदय, मेंदू, डोळे आणि मूत्रपिंडावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

Sakshi Sunil Jadhav

उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आहे.

हृदय, मेंदू आणि डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो.

वेळेवर तपासणी व संतुलित आहार गरजेचा.

नियमित व्यायाम व ताण नियंत्रण आवश्यक.

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन ही अशी स्थिती आहे जी सुरुवातीला कोणतही स्पष्ट लक्षणं दाखवत नाही. मात्र ही शांतपणे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवत असते. वेळेवर नियंत्रण न मिळाल्यास याचा परिणाम हृदय, मेंदू, मूत्रपिंड, डोळे आणि लैंगिक आरोग्यावरही गंभीर स्वरुपात होतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर सतत दाब येतो. त्यामुळे त्यांच्या भिंतींवर सूक्ष्म फाटे तयार होतात आणि त्या ठिकाणी फॅटचे थर साचतात. याच्या प्लेक तयार होऊन रक्तवाहिन्या अरुंद होतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

मेंदूतील रक्तवाहिन्यांवर दाब वाढल्यामुळे त्या फुटू शकतात किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. तुम्हाला जास्तवेळ उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर, मेंदूतला रक्तप्रवाह कमी होतो, स्मरणशक्ती कमी होते, गोंधळ, आणि डिमेन्शिया यांसारख्या समस्या उद्भवतात. डोळ्यांमधील सूक्ष्म रक्तवाहिन्याही उच्च रक्तदाबामुळे प्रभावित होतात. या वाहिन्या फुटणे, गळती होणे किंवा अरुंद होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे दृष्टी कमी होते, डोळे सुजतात किंवा गंभीर प्रकरणांमध्ये दृष्टी गमावण्याचा धोका संभवतो.

हृदयालाही या स्थितीचा मोठा फटका बसतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक ताकद लावावी लागते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या भिंती जाड होतात, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतात. कालांतराने हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांवरही याचा परिणाम होतो. या वाहिन्या नुकसान होते. मूत्रपिंडाचे रक्त गाळण्याचे कार्य प्रभावित होतं. जास्तवेळ नियंत्रण न ठेवल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते.

फक्त एवढंच नव्हे, तर उच्च रक्तदाबाचा परिणाम लैंगिक आरोग्यावरही होतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा किंवा उत्तेजना कमी होणे अशा समस्या दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case: अंगावर जखमा, तोंडात मोजा कोंबला; चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक माहिती उघड

Malshej Ghat : माळशेज घाटाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Maharashtra News Live Update : पंढरपूरच्या कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता

Wedding Market News: ऐकावं ते नवलच! येथे भरतो चक्क 'नवरा-नवरीचा' बाजार; भिंतीवरचे कागद वाचून ठरतात लग्न!

World Asthma Day: वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो? थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT