Neck Pain : सावधान! तुमची उशी मानदुखीचे कारण तर नाही ना? तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

Sleep Health: जपानच्या तज्ज्ञांच्या संशोधनानुसार चुकीच्या उशीमुळे मानेपासून खांद्यापर्यंत ताण निर्माण होतो. त्यामुळे झोपेअभावी थकवा, डोकेदुखी, मायग्रेन आणि न्यूरोलॉजिकल समस्या वाढतात.
Wrong Pillow Causes
Neck Paingoogle
Published On
Summary

चुकीच्या उशीमुळे मानेपासून खांद्यापर्यंत ताण निर्माण होतो.

झोपताना योग्य उंची आणि आकाराची उशी वापरा.

मान आणि पाठीच्या हाडांच्या रेषेत झोपायची सवय लावा.

मानदुखी, चक्कर किंवा डोकेदुखी वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनेकांना उशीशिवाय पूर्ण झोप लागत नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं की, उशीमुळे शांत झोप लागते. मात्र उशी जितकी त्रासदायक आहे, तितकी ती मानेसाठी धोकादायक आहे. टोकियोच्या स्पाईन इन्स्टिट्यूटमधील प्रसिद्ध वेदना तज्ज्ञ डॉ. हिरोशी तनाका यांनी केलेल्या एका संशोधन अहवालात एक मुख्य बाब चर्चेत आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण दररोज वापरत असलेली साधी उशी आपल्या मानेचं आणि खांद्याचं गंभीर नुकसान करते आणि आपल्याला याची कल्पनाही नाही!

ट्रॅपिजियस मसल म्हणजे मानेपासून खांद्यापर्यंत असलेला महत्त्वाचा स्नायू झोपेत सतत ताणलेल्या स्थितीत राहतो. त्यामुळे स्नायूंना विश्रांतीच मिळत नाही. हे म्हणजे शरीरावर होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळासारखं आहे. आठ तास मान वाकडी करून उभं राहाल का? पण आपण दररोज झोपताना असंच करतो.

Wrong Pillow Causes
Cholesterol Control Tips: दररोज हा १ पदार्थ खाल्याने कोलेस्टेरॉलचा धोका होईल कमी; वाचा फायदे

पेन कॅस्केड इफेक्टम्हणजे काय?

या अभ्यासात डॉ. तनाकांनी एक नवीन गोष्ट उघड केली. ती म्हणजे Pain Cascade Effect.म्हणजे मानेतील ताण हळूहळू खांद्यापर्यंत आणि नंतर पाठीपर्यंत पसरतो. यामुळे स्नायू घट्ट होतात, रक्तपुरवठा कमी होतो आणि दीर्घकालीन वेदना निर्माण होतात. त्यातच, रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे स्नायू श्वास घेऊ शकत नाहीत असे ते म्हणतात. याचा परिणाम म्हणजे मान व खांद्यात सतत वेदना, झोपेतून उठल्यानंतर थकवा, डोकेदुखी आणि मायग्रेनचा धोका, चुकीच्या उशीमुळे मायग्रेन आणि न्यूरोलॉजिकल समस्या असा परिणाम होतो.

डॉ. तनाकांच्या संशोधनानुसार चुकीच्या उशीमुळे फक्त मानदुखी नव्हे, तर गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या देखील उद्भवू शकतात. २५ वर्षांच्या त्यांच्या अभ्यासात दिसून आले की, अनेक रुग्णांमध्ये अचानक डोकेदुखी, चक्कर येणे, धूसर दृष्टी आणि प्रकाशाची संवेदनशीलता वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

Wrong Pillow Causes
Alcohol Damages Liver: दारुमुळे लिव्हरवर किती गंभीर परिणाम होतो? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
Q

चुकीची उशी वापरल्याने मानेवर काय परिणाम होतो?

A

चुकीची उशी मानेचा आकार बिघडवते, ज्यामुळे मान आणि खांद्याचे स्नायू ताणले जातात व वेदना वाढतात.

Q

Pain Cascade Effect म्हणजे काय?

A

मानेतील ताण हळूहळू खांद्यापर्यंत आणि पाठीपर्यंत पसरतो, ज्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि दीर्घकालीन वेदना निर्माण होतात.

Q

चुकीच्या उशीमुळे मायग्रेन का वाढतो?

A

रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि स्नायूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही, त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा धोका वाढतो.

Q

योग्य उशी निवडण्यासाठी काय लक्षात ठेवावे?

A

मानेच्या नैसर्गिक वळणाला आधार देणारी, मध्यम उंचीची आणि शरीराच्या स्थितीनुसार उशी वापरणे योग्य असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com