What happens to body after death saam tv
लाईफस्टाईल

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

What happens to body after death: मृत्यू ही एक अशी घटना आहे, ज्याबद्दल मानवाच्या मनात अनेक शतकांपासून गूढ आणि कुतूहल आहे. अनेक धर्म आणि संस्कृतींमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल विविध धारणा आहेत, पण विज्ञान या घटनेकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते.

Surabhi Jayashree Jagdish

  • मृत्यूनंतरही मेंदू सात मिनिटे सक्रिय राहतो.

  • मेंदू मृत्यूला नाकारण्याचा शेवटचा प्रयत्न करतो.

  • हिंदू धर्मात मृत्यू हा अंत नसून प्रवासाचा एक भाग आहे.

सात मिनिटं.... व्यक्तीच्या मृत्यूनंतर एवढाच वेळ आपल्या मेंदूचा प्रवास चालू राहतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या क्षणी आपण 'क्लिनिकली डेड' असतो पण पूर्णपणे सर्व संपलेलं नसतं. घड्याळ पुढे सरकत, लोक रडतात, जग चालू राहतं. पण त्या वेळी आपल्या आत खोल कुठेतरी काहीतरी घडत असतं. ही केवळ न्यूरॉन्सचे हालचाल नसते किंवा आत्म्याच्या प्रवासाविषयीच्या प्राचीन संकल्पनाही नव्हे हे त्या क्षणात आपल्या संपूर्ण आयुष्याच्या अर्थाशी संबंधित असतं.

अनेकांना प्रश्न पडतो की, “मृत्यूनंतर काय होतं?”. मात्र अशातच अजून एक प्रश्न असतो तो म्हणजे तर मृत्यू अगदी समोर असताना मागे वळून पाहताना काय जाणवतं?

मेंदूचा लढा- मृत्यूला नाकारण्याचा शेवटचा प्रयत्न

आपल्या हृदयाची स्पंदनं थांबली तरी मेंदू काही क्षणात बंद होत नाही. उलट मेंदू त्या अंतिम क्षणी जोरात लढा देतो. electrical activity, अचानक उसळलेली मेंदूची हालचाल, जणू काही मृत्यूला नाकारत असतो. काही वैज्ञानिक अभ्यासांमध्ये मृत्यू झाल्यावरही काही मिनिटं मेंदूत हालचाली नोंदवल्या गेल्या आहेत.

काही जण जे मृत्यूच्या जवळ जाऊन पुन्हा आले त्यांनी सांगितलं की, त्या क्षणात आयुष्य फ्लॅशबॅकसारखं दिसतं. सुरळीत क्रमाने नव्हे, तर आठवणींमधून, भावनांमधून अगदी चांगल्या, वाईट, क्षुल्लक क्षणांमधून.

या अंतिम मिनिटांचं विशेष महत्त्व हे की, ते काही नवं दाखवत नाही तर जे आधीपासून आपल्यात होतं ते अधिक स्पष्ट करतात आणि त्या क्षणी तुमच्या यशापेक्षा, अपयशापेक्षा किंवा पश्चात्तापापेक्षा फक्त एक गोष्ट महत्त्वाची वाटते तुम्ही ते आयुष्य जसं जगलात.

आत्म्याचा पुढचा टप्पा

हिंदू धर्मात मृत्यू म्हणजे शेवट मानलेला नाही. तो केवळ एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाण्याचा एक टप्पा आहे. पण इथंच एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली जाते ती म्हणजे आत्मा तात्काळ देह सोडत नाही. आत्मा काही काळ देहाजवळच असतो. यावेळी आत्मा सगळं पाहतो, ऐकतो आणि स्वतःच्या मृत्यूचं साक्षीदार बनतो.

गरुड पुराणानुसार, आत्म्याचा प्रवास बारा दिवसांत सुरू होतो आणि मग त्याच्या कर्मांनुसार पुढचा जन्म ठरतो. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की, माणूस जसे जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो तसंच आत्मा जुना देह सोडून नवीन शरीर धारण करतो.

पण यातला खरा मुद्दा हा तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवता की नाही, कर्म आणि परिणाम या संकल्पना तुमचं आयुष्य नक्कीच घडवत असतात. कारण मृत्यूच्या येण्याच्या बराच काळ आधी आपण आपल्या शेवटच्या त्या ७ मिनिटांचा आरसा तयार करत असतो. या गोष्टी आपल्या कृतींतून, बोलण्यातून किंवा निवडीतून दिसून येतात.

आयुष्याचं शेवटचं प्रतिबिंब

कल्पना करा तुमचं आयुष्य संपत आलंय. तुमचा मेंदू, त्याच त्या सात मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य दाखवतो. तुमच्या आयुष्यातले लोकं ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं, ज्यांना दुखावलं, जे क्षण वाया घालवले आणि जे क्षण तुमचं आयुष्य अनंत वाटावं असं भासवत होते. त्या क्षणी तुमच्या आतून एक प्रश्न उमटतो खरंच, इतकं पुरेसं होतं का?

मृत्यूचं खऱ्या अर्थाने शिक्षण हे मृत्यूनंतर काय होतं याच्याशी संबंधित नसतं ते मृत्यूपूर्वी काय घडतं यावर असतं. शेवटी आपण त्या आयुष्याच्या ७ मिनिटांना आपण बदलू शकत नाही तर आपण फक्त ते पाहू शकतो.

मृत्यूनंतर मेंदू किती वेळ चालू राहतो?

मृत्यूनंतरही मेंदू सात मिनिटे चालू राहतो, असे वैज्ञानिक अभ्यासात नमूद केले आहे.

मृत्यूच्या क्षणी मेंदू काय करतो?

मेंदू मृत्यूला नाकारण्याचा शेवटचा प्रयत्न करतो आणि विद्युत सक्रियता वाढवतो.

मृत्यूच्या आधी आयुष्याचे क्षण कसे दिसतात?

मृत्यूच्या आधी आयुष्यातील चांगले-वाईट क्षण आठवणींमध्ये पुन्हा येतात .

हिंदू धर्मानुसार मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते?

आत्मा देह सोडतो, पण बारा दिवसांत त्याच्या कर्मानुसार पुढचा जन्म ठरतो.

मृत्यूपूर्वीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे?

तुमच्या आयुष्यातील कृती खरोखर पुरेशा होत्या का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT