LDL cholesterol increase SAAM TV
लाईफस्टाईल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

LDL cholesterol increase: कोलेस्ट्रॉलची औषधं अचानक बंद केल्याने LDL पुन्हा वाढू शकतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. रिपोर्ट्स नॉर्मल आले तरी औषधं थांबवू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार बंद करणं धोकादायक ठरू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

हेल्थ रिपोर्ट काढले आणि ते नॉर्मल आले की आपल्याला वाटतं आता सगळं ठीक आहे. पण कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत हा निष्कर्ष धोकादायक ठरू शकतो. डॉक्टरांच्या मते, कोलेस्टेरॉलची औषधं मध्येच बंद करणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.

कावेरी हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट प्रा. पी. मनोकर यांनी सांगितलं की, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुरू केलेली औषधं अचानक बंद केल्यास LDL कोलेस्ट्रॉल पुन्हा वाढू शकतं. यामुळे मागील काही महिन्यांत मिळवलेला फायदा पूर्णपणे नाहीसा होतो आणि हार्ट अटॅक, इस्केमिक स्ट्रोक किंवा इतर रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. यामध्ये व्यक्तीला जरी तब्येत बरी वाटत असली तरी हा धोका कायम असतो.

औषधं घेणं बंद केल्यानंतरही काही आठवड्यांतच कोलेस्ट्रॉल पुन्हा वाढू लागतं. “रिपोर्ट्स चांगले आले की अनेक जण औषधांची गरज उरली नाही असं समजतात. पण उपचार थांबवल्यावर शरीरातील स्थिरता बिघडते आणि धोका पुन्हा वाढतो,” असं डॉ. मनोकर यांनी सांगितलं आहे.

औषधं बंद केल्यावर शरीरात काय होतं?

स्टॅटिन्ससारखी औषधं LDL कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेल्या प्लॅकला स्थिर ठेवतात. पण औषधं अचानक बंद केल्यावर काही धोकादायक बदल होऊ लागतात. LDL कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढतं आणि रक्तवाहिन्यांमधील प्लॅकमुळे सूज येते.

कोलेस्ट्रॉल पुन्हा का वाढतं?

आपलं शरीर नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल तयार करतं. काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्याचा वेग जास्त असतो. औषधं हा स्तर नियंत्रित ठेवतात, पण उपचार थांबवल्यावर शरीर पुन्हा जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल तयार करू लागतं. LDL पूर्वीच्या पातळीवर पोहोचतो आणि औषधांचा फायदा कमी होऊ लागतो. यालाच रिबाऊंड इफेक्ट म्हटलं जातं.

लोक औषधं का थांबवतात?

डॉ. मनोकर यांच्या मते, अनेक जण रिपोर्ट्स चांगले आल्यानंतर स्वतःला पूर्णपणे फीट समजतात. काहींना दीर्घकाळ औषधं घ्यायची भीती वाटते, तर काहींमध्ये कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांबाबत गैरसमज असतात. पण रिपोर्ट्स चांगले आले हे औषधं काम करत असल्याचं लक्षण असतं, त्यामुळे अशा वेळी औषधं बंद करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT