आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदा तरी असं झालं असेल की, ड्रॉवरमधली एखादी औषधं घेतली आणि नंतर लक्षात आलं की ती एक्सपायर झाली आहे. मग लगेच मनात येणारे प्रश्न की “काही झालं तर?”, “काही साइड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना?” पण तज्ज्ञ काय सांगतात हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं.
काही तज्ज्ञांच्या मते, एक्सपायरी औषधं कधी कधी शरीरावर घातक परिणाम करू शकतात. मात्र बहुतेक वेळा ती जास्त धोकादायक ठरत नाहीत कारण कालांतराने त्यांच्या घटकांमध्ये बदल होतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या माहितीनुसार, कालांतराने औषधांचा परिणाम कमी होतो हे खरं आहे. पण कालबाह्य झाल्यानंतरदेखील अनेक औषधं त्यांच्या मूळ प्रभावाचा बराचसा भाग टिकवून ठेवतात. चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालं आहे की नायट्रोग्लिसरीन, इन्सुलिन आणि द्रवरूप अँटिबायोटिक्स वगळता बहुतेक औषधं वर्षानुवर्षे कार्यक्षम राहू शकतात.
फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या मते, काही औषधं कालबाह्य झाल्यावर कमी घातक ठरतात. पण काही औषधं, विशेषतः द्रवरूप असलेली, जिवाणूंच्या वाढीस जास्त प्रवण असतात. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.