anxiety disorder symptoms, Stress symptoms
anxiety disorder symptoms, Stress symptoms ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Anxiety Disorder: सतत चिंता करण्याची लक्षणे कोणती ? त्यावर वेळीच उपचार कसा कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्याला कामाचा किंवा इतर कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींचे टेंशन येते. सतत चिंता केल्याने आपल्याला ताण किंवा डिप्रेशन येऊ शकते. परंतु खूप कमी लोकांना चिंता व डिप्रेशनमधला फरक माहित नाही. (anxiety disorder symptoms)

हे देखील पहा -

कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव घेणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ज्याला आपण चिंता म्हणू शकतो. सतत चिंता करणे हा सर्व सामान्य विकारांपैकी एक आहे. आपण सतत चिंता केल्याने अस्वस्थत होऊ शकतो. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आणि नातेसंबंधावर होऊ शकतो त्यामुळे चिंता वाढू लागते व त्याचे विकारात रुपातंर होते. चिंता हा विकार सामान्य मानसिक समस्या आहे. ज्याची लक्षणे व्यक्तीपरत्त्वे भिन्न असू शकतात. (anxiety disorder symptoms)

लक्षणे -

१. चिंता करण्याचे मुख्य लक्षण तणाव असू शकते.

२. अशावेळी व्यक्तीला सतत चिंताग्रस्त ताण आणि अस्वस्थता जाणवते.

३. सतत नकारात्मक विचार आणि धोक्याची भावना वाटू लागते.

४. चांगली झोप येत नाही किंवा झोपायला त्रास होतो. नेहमीपेक्षा वेगाने श्वास घेणे किंवा काही वेळा श्वास घेण्यास त्रास होणे.

५. हृदयाची धडधड, मळमळ, चक्कर येणे आणि वारंवार तोंड कोरडे पडणे. हात किंवा पाय थंड पडणे, सामान्य स्थितीतही शरीरात घाम येणे किंवा मुंग्या येणे.

या आजारातून मुक्त होण्यासाठी आपली जीवनशैली कशी असायला हवी -

१. आपल्या जीवनशैलीत आपण फिजिकल एक्टिविटी किंवा वर्कआउट करायला हवे.

२. सतत स्वत:ला आपण कामात व्यस्त ठेवायला हवे.

३. आपण अशावेळी जास्त झोप घ्यायला हवी. आपण रोज ७ ते ८ तास आपण झोप घ्यायला हवी.

४. चांगल्या आरोग्यासाठी व मनासाठी चांगला आहार घ्यावा.

५. आपल्या आहारात भाज्या, फळे (Fruit), मांस व अंडी (Eggs) यांचा समावेश आपण करू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

SCROLL FOR NEXT