काळी मिरी : अनेक आजारांवर व त्रासावर बहुगुणी

स्वयंपाकघरातील सगळ्या मसाल्यांपैकी इवलुशी काळी मिरी(Black Papper).
Black pepper benefits for health, Benefits of Spices
Black pepper benefits for health, Benefits of Spices ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वयंपाकघरातील (Kitchen) सगळ्या मसाल्यांपैकी इवलुशी काळी मिरी. जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण काळी मिरीचा वापर करतो. (Black pepper benefits for health)

हे देखील पहा -

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली असते. काळी मिरी ही बऱ्याच रोगांवर गुणकारी मानली जाते. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, जीवनसत्त्व ए व इतर पोषक तत्व आढळतात. जेवणातील स्वाद वाढवण्यासाठी काळी मिरीचा वापर केला जातो. जेव्हा आपल्याला काही चटपटीत खाण्याची इच्छा होते किंवा सलादला चवदार बनवण्यासाठी आपण काळी मिरीचा आवर्जून वापर करतो. याचा सुगंध किचनमध्ये सतत दरवळत राहतो. याच्या वापरामुळे श्वसनाचे आजार, खोकला, पोटाचे रोग आदींसाठी उपयोगी ठरते. पोटात काचेचा तुकडा किंवा काटा गेल्या असल्यास पिकलेल्या अननसासोबत काळी मिरी व सैंधव मीठासोबत लावून खाल्ल्यास सहजतेने काढता येते. उलटी किंवा मळमळत असेल तर लिंबासोबत काळी मिरी पावडर व सैंधव मीठ चाखल्ल्याने मळमळ बंद होते. (Black pepper benefits in marathi)

काळ्या मिरीचा आपल्याला फायदा कसा होतो-

१. बध्दकोष्ठतेचा त्रास होत असल्यास आपण काळी मिरीचे चार-पाच दाणे दुधासोबत रात्री घेतल्यास फायदा होईल.

२. मलेरिया झाला असल्यास काळीमिरीचे चूर्ण तुळशीच्या रसात मिसळून प्यायल्याने फायदो होतो.

Black pepper benefits for health, Benefits of Spices
अंड्याच्या उग्रवासापासून सुटका हवी आहे तर या टिप्स फॉलो करा

३. काळी मिरपूड, तूप व खडीसाखर समप्रमाणात मिसळून त्याचे चाटण सकाळ-संध्याकाळ घेतल्यास फुफ्फुस व श्वसनांसंबंधीत आजारामध्ये आराम मिळतो.

४. काळी मिरीचे चूर्ण मधात मिसळून घेतल्यास पडशापासून आराम मिळतो.

५. ताक व मठ्ठ्यात काळी मिरीचे चूर्ण मिसळून घेतल्यास पोटाचे आजार दूर होतील.

६. अपचनाची समस्या (Problems) होत असेल तर लिंबाचा अर्धा तुकड्यात काळे मीठ व मिरपूड घालून ते गरम करा व ते चोखल्यास आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com