Ganesh Chaturthi Visarjan saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi Visarjan 2024: गणपती विसर्जनाचे नियम काय आहेत? पाहा आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi Visarjan 2024: आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे. कोणते शुभ मुहूर्त आहेत आणि नेमके नियम काय आहेत, ते पाहूयात

Surabhi Jayashree Jagdish

सध्या अगदी धुमधडाक्यात गणपतीचा उत्सव साजरा केला जातोय. काल गणपती बाप्पा विराजमान झाले असून आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणारा गणेश चतुर्थीचा हा सण विशेष असून या उत्सवात गणेशाची पुजा केली जाते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी या गणपती बाप्पााला निरोप दिला जातो. यावेळी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोपही देण्यात येतो. आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असून यावेळी आपण कोणते नियम पाळले पाहिजे ते पाहूयात.

दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन

७ तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले होते. यानंतर आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पाची स्थापना चतुर्थी तिथीला दुपारी होते आणि विसर्जन दुपारनंतर होतं. म्हणून याला दीड दिवसात गणेश विसर्जन असं म्हटलं जातं.

८ सप्टेंबर २०२४ ची शुभ वेळ

  • अभिजीत मुहूर्त 11:53 ते 12:43 मिनिटांपर्यंत

  • विजय मुहूर्त 2:24 ते 3:14 मिनिटांपर्यंत

  • संध्याकाळची वेळ 6:34 ते 7:43 पर्यंत

विर्सजनाचे नियम काय आहेत?

जर तुमच्या घरी आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असेल तर तुम्ही या नियमांचं पालन केलं पाहिजे. यामध्ये विसर्जन नेहमी शुभ मुहूर्त पाहूनच करावं. यावेळी गणपतीची पूजा करताना गणपतीला दाखवलेली सर्व सामग्री विसर्जित करावी. जर तुम्ही गणपतीला नारळ दाखवला असेल तर तो फोडू नये. त्या नारळाचंही विसर्जन करावं

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT