Water For Weight Loss: डाएट-जीम सोडा...! आता केवळ पाणी पिऊन करा तुमचं वजन कमी, कसं पाहा

Water For Weight Loss: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल मोठ्या प्रमाणात वजन वाढीची समस्या जाणवू लागलीये. मात्र जर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर या पद्धतीचा अवलंब करा.
Water For Weight Loss
Water For Weight Losssaam tv
Published On

आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन वाढण्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते. वजन कमी करण्यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो. मात्र अनेकदा जीम किंवा डाएट करून देखील तुमचं वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एका खास पद्धतीची माहिती देणार आहोत.

आतापर्यंत वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएटचा मार्ग स्विकारला असेल किंवा तुम्ही जीमचा ऑप्शन देखील ट्राय केला असेल. पण तुम्हाला माहितीये का केवळ पाणी प्यायल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.

Water For Weight Loss
Cholesterol: नसांमध्ये जमलेलं वाईट कोलेस्ट्रॉल दूर करेल केवळ हा एक ज्यूस, बनवण्याची पद्धतही एकदम सोपी!

पाणी प्यायल्याने होणार तुमचं वजन कमी?

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला महागडे उपचार घेण्याची किंवा जीममध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. केवळ पाण्याने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता. जाणून घेऊया फक्त पाणी पिऊन तुम्ही वजन कसं मी करू शकता?

असं कमी करा पाणी पिऊन तुमचं वजन

आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक असतं. पाणी प्यायल्यामुळे चयापचयच म्हणजेच मेटाबॉलिज्म सुधारतं. शिवाय यामुळे तुमच्या शरीराची ऊर्जेची पातळी देखील वाढवण्यास मदत होऊ लागते. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित केल्या गेल्या की वजन सहज कमी होण्यास मदत होते.

रिपोर्टनुसार, पुरुषांनी दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्यायलं पाहिजे. तर दुसरीकडे महिलांनी किमान 2 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. शिवाय जेवणापूर्वी पाणी प्यावं का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात असतो. यावेळी जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे भूक नियंत्रित राहते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण जेवलं जात नाही. परिणामी वजन कमी होण्यास देखील आपोआप मदत होते.

वजन कमी करण्यासाठी असं प्या पाणी

वजन कमी करण्यासाठी काहीसं कोमट पाणी फायदेशीर ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. कोमट पाण्याच्या मदतीने आपण खाल्लेलं अन्न सहज पचतं. मात्र ज्यावेळी तुम्हाला प्रचंड तहान लागते त्यावेळी भरपूर पाणी प्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Water For Weight Loss
Detox Body: तुमच्या शरीरात टॉक्सिन आहे? 'हे' बदल दिसल्यास समजून जा शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आलीये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com