Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? या सोप्या टीप्स फॉलो करा, सुटलेलं पोटही राहिल नियंत्रणात

Weight Loss : हिवाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बरेच बदल दिसून येतात. जर तुम्हीही खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला तुमच्या या सवयींकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Shraddha Thik

Tips :

हिवाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बरेच बदल दिसून येतात. जर तुम्हीही खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला तुमच्या या सवयींकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या सर्व गोष्टींमुळे वजन झपाट्याने वाढू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमर्यादित अन्न सेवन हे वजन वाढण्याचे कारण ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी आहारासोबतच व्यायामही (Exercise) खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी (Weight Loss) करायचे असेल तर तुम्ही या सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता.

रोज व्यायाम करा

दररोज व्यायाम केल्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. व्यायाम केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर शरीराची ताकद वाढवण्यासही उपयुक्त आहे. व्यायामामध्ये तुम्ही चालणे, कार्डिओ, नृत्य आणि पोहणे देखील करू शकता.

साखर

कुकीज, केक आणि इतर साखरयुक्त गोष्टींचा वापर कमी करा. कारण त्यात आढळणारी साखर तुमचे वजन झपाट्याने वाढवू शकते.

चरबी

जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा कारण जास्त तेल आणि मसाल्यांचे सेवन केल्याने वजन वाढतेच शिवाय शरीराला इतरही अनेक समस्या निर्माण होतात.

रात्रीचे जेवण

वजन कमी करायचे असेल तर रात्री हलके अन्न खा. जर तुम्ही रात्री जड जेवण खाल्ले तर तुमच्या वजनावर तसेच पचनावरही परिणाम होतो.

हर्बल ड्रिंक्स

हर्बल ड्रिंक्सचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हर्बल ड्रिंकचे सेवन करा. रात्री झोपण्यापूर्वी हर्बल ड्रिंकचे सेवन देखील करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT