Menstrual Cycle: मासिक पाळीत व्यायाम करावा की नाही? जाणून घ्या सविस्तर

Menstrual Cycle Tips: मासिक पाळीत पौष्टिक आहार घेणे, शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Menstrual Cycle
Menstrual CycleSaam Tv
Published On

Menstrual Cycle Workout:

स्त्रियांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी येते. यामागे नैसर्गिक कारण आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मासिक पाळीवर परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीत पौष्टिक आहार घेणे, शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. मासिक पाळीत व्यायाम करावा की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

मासिक पाळीत अंग दुखणे, थकवा जाणवणे, पोटात वेदना होणे यांसारख्या समस्या होतात. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी. मासिक पाळीत व्यायाम केल्याने वेदना होतात असे अनेकांना वाटते. यासंदर्भात जाणून घेऊया.

मासिक पाळीत व्यायाम करता येतो की नाही?

मासिक पाळीत महिला व्यायाम करु शकतात. व्यायाम केल्याने जास्त त्रास होत नाही. परंतु शरीराला जास्त ताण देऊन व्यायम करु नका. अन्यथा त्रास होऊ शकतो. पोट, कंबरेखालील भागात वेदना होऊ शकतात. जास्त प्रमाणात व्यायम केल्याने शरीरात क्रॅम्प्स, थकवा येऊ शकतो.

मासिक पाळीत व्यायाम केल्याचे फायदे

मासिक पाळीत व्यायाम केल्याने आळस येत नाही. शरीरातील थकवा नाहीसा होतो. तसेच मूड स्विंगच्या समस्या कमी होतात. नियमित व्यायाम केल्याने स्तनाची सूज कमी होते. तसेच मासिक पाळीच्या काळात चिडचिडपणाची समस्या कमी होते.

Menstrual Cycle
Ind vs Aus Final Match : भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पाहाताना अचानक नेट संपलं तर..., फायनल मॅच पाहण्यासाठी किती डेटाची गरज?

मासिक पाळीत व्यायम करणे चांगले असते. मात्र, जास्त प्रमाणात व्यायाम करु नये. शरीरास जास्त ताण देऊ नये. ३०-४० मिनिटे व्यायाम करावा. यापेक्षा जास्त वेळ व्यायम केल्याने पोटदुखी, पाठदुखीची समस्या होऊ शकते.

मासिक पाळीत या गोष्टी करु नयेत

मासिक पाळीत रिकाम्या पोटी व्यायाम करु नये. तसेच जेवल्यानंतर लगेच व्यायाम करु नये. जेवल्यावर काही तासांनी व्यायाम करावा. व्यायाम करताना शरीराला जास्त ताण देऊ नका.

Menstrual Cycle
युजर्ससाठी ऑफर्सचा पाऊस! Jio, Airtel आणि Vi देतेय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा फ्री; किमत पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com