वैष्णवी राऊत
वजन कमी करण्यासाठी डॉक्टर ब्रिस्क एक्सरसाइज करायला सांगत असतात. यामध्ये साइकलिंग, स्विमिंग, उड्या मारणं यासोबकत चालणं देखील समाविष्ट असतं. चालणं हा त्यातल्या त्यात सोपा पर्याय असल्याने बहुतेच जण हाच पर्याय निवडतात. चालण्यासाठी शूज घेतात, ट्रॅक पॅन्ट घेतात, बॉटल वगैरे असं सगळं समान जुळवून नियमित चालायला सुरूवात करतात. पण तरी अनेकांची तक्रार असते की रोज चालूनही वजन काही कमी होत नाही. तर याला कारण आहे, योग्य पद्धतीने न चालणं.
होय, चालण्याचीही एक योग्य पद्धत असते, ती अनुसरली की झपाट्याने वजन कमी होतं. कोणती आहे ही चालण्याची योग्य पद्धत? हफिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये न्यूयॉर्क स्पेशल सर्जरी रूग्णालयाचे फिजिकल थेरेपिस्ट टेलर मोल्डोफ यांनी ही पद्धत सांगितली आहे.
स्पीड वॉकिंग
वजन कमी करण्यासाठी दरदिवसाला 30 मिनिटांची एरोबिक एक्सरसाइज पुरेशी आहे. पण यासाठी चालण्याची योग्य पद्धत अवलंबणं गरजेचं आहे. टेलर मोल्डोफ यांच्यानुसार, अर्ध्या तासात 5000 ते 10000 पावलं चालणं आवश्यक आहे. चालण्याचा वेग 5 ते 6 किलोमीटर प्रति तास असावा. तुमच्या हृदयाचे ठोके 100 बीट प्रति मिनिट असावी.
इंटरवल जॉगिंग
इंटरवल जॉगिंग या प्रकारामध्ये चालणं किंवा पळण्याच्या सोबत वेगाने चालण्याचा समावेश असतो. जर तुम्ही खूप वेगाने चालू शकत नसाल, तर हळू चला. 1 मिनिटापर्यंत तुमचा वेग कमी असावा, 30 सेकंदानंतर वेगाने चला किंवा हवं तर पळा. त्यानंतर पुन्हा एक मिनिट सामान्य वेगाने चला. हळूहळू 30 सेकंदाचा वेळ 1 मिनिटापर्यंत वाढवा. म्हणजे एक मिनिट वेगाने चला आणि पुन्हा एक मिनिट सामान्य वेगाने चला. याला इंटरवल जॉगिंग असं म्हणतात. याने देखील वजन झपाट्याने कमी होतं.
उंच जागेवर चालणं
ज्याठिकाणी थोडी उंच जागा असेल, अशा ठिकाणी चालणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. उंच ठिकाणावर चालण्यासाठी शक्ती लागते, शिवाय घामही निघतो. यामुळे फॅट्स बर्न व्हायला मदत होते. त्यामुळे ज्या गार्डनमध्ये हळूहळू वॉकिंग ट्रॅक उंच होतो, अशा पार्कमध्ये तुम्ही चालायला जाऊ शकता.
वॉक आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग
स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये पुश-अप्स, वजन उचलणं, स्क्वाट्स आणि इतर प्रकारच्या व्यायामांचा समावेश असतो. जर तुम्ही याप्रकारचा व्यायाम करत असाल, तर त्यात चालण्याचाही समावेश करा. त्यासाठी काय कराल? तर काही वेळ चला, मग काही वेळ पुश-अप्स करा. त्यानंतर पुन्हा थोडा वेळ चला. आणि मग स्क्वाट्स करा. अशाप्रकारे तुम्ही आळीपाळीने चालणं आणि व्यायाम करू शकता. शिवाय चालताना हातात किंवा खांद्यावर तुम्ही वजन घेऊनही चालू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.