Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss: वजन कमी करायचय? रोज सकाळी लिंबू पाणी प्या; होतील फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Weight Loss Drink:

सध्या सर्वांचेच जीवन खूप जास्त धावपळीचे झाले आहे. अनेकांना स्वतः च्या शरीराकडे लक्ष द्यायलादेखील वेळ नाहीये. यामुळे आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या वाढतात. त्यात अनेकदा खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात. त्यामुळे आपोआप शरीरावर परिणाम होतो. वजन वाढते. त्यामुळे खूप त्रास होतो.

वजन वाढीच्या समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येतात. त्यासाठी अनेक लोक जिमला जातात. परंतु यावर काही घरगुती उपाय खूप फायदेशीर असतात. घरच्या घरी तुम्ही आहारात काही बदल करुन वजन कमी करु शकतात.

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यावे. परंतु त्याचसोबत त्यात दोन थेंब लिंबाचा रस घातल्याने खूप फायदा होतो. लिंबू हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे पेय प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते

कोमट पाणी त्यात मध आणि लिंबू घातल्याने पचक्रियेवर फायदा होतो. या पेयातील अॅसिड अन्न पचण्यास मजत करते. त्यामुळे पोट निरोगी राहते. परिणामी वजन नियंत्रित राहते.

पेशींसाठी उपयुक्त

लिंबामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात. ते तुमच्या शरीराचे रोगांपासून संरक्षण करतात. तसेच यात खूप जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. जे पेशींचे ऑक्सिडेशन होण्यापासून बचाव करतात.

वजन कमी करण्यास मदत

दररोज कोमट पाणी, मध आणि त्यात लिंबू घातल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन नियंत्रित राहते. लिंबू, मध आणि कोमट पाणी हे डिटॉक्स पेय आहे. यात कॅलरीज देखील कमी असतात. हे पाणी पिल्याने पोट भरल्यासारखे राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी होण्यास मदत होते.

किडनीसाठी फायदेशीर

रोज लिंबू पाणी प्यायल्याने किडनी स्टोनच्या समस्या होत नाही. जे लोक कमी पाणी पितात. त्याला किडनी स्टोन होण्याची दाट शक्यता असते. त्यांमुळे लिंबूपाणी प्यायल्याने हायड्रेट राहते आणि स्टोनचा धोका कमी होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT