Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips: Dieting करुन वैतागलात? पोटाची चरबी कमी होत नाहीये? या ४ पदार्थांना आहारातून लगेच करा बाय

Tips for Weight Loss : वाढत्या वजनाचा त्रास अनेकांना सहन करावा लागतोय. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. खराब जीवनशैली आणि जंकफूडचे अतिप्रमाणात सेवन यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते.

कोमल दामुद्रे

Foods to Avoid for Weight Loss :

वाढत्या वजनाचा त्रास अनेकांना सहन करावा लागतोय. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. खराब जीवनशैली आणि जंकफूडचे अतिप्रमाणात सेवन यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते.

वाढत्या वजनाला नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात,व्यायाम करतात. परंतु, काही केल्या वजन कमी (Weight Loss) होत नाही. वजन कमी करण्यासाठी काहीजण डाएटिंगचा पर्याय निवडतात. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहारात (Food) कोणत्या पदार्थांचा समावेश करताय हे देखील पाहाणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही देखील हे पदार्थ खात असाल तर आजच त्यांना बाय बाय करा.

1. केळी

केळीमध्ये (Banana) शरीराला पुरवणारे अनेक घटक असतात परंतु, यामध्ये अधिक प्रमाणात कॅलरीज असतात. साधारणत: एका केळीमध्ये १५० प्रमाणात कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढते.

2. मनुका

मनुक्याचे सेवन केल्याने वजन कमी होते हे जितके खरे आहे तितकेच शरीरासाठी नुकसानकारक. एक वाटी मनुक्यामध्ये सुमारे ५०० कॅलरीज असतात. एकाच वेळी खूप मनुके खाल्ल्याने शरीरावर परिणाम होतो.

3. द्राक्षे

द्राक्षे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही. १०० ग्रॅम द्राक्षांमध्ये ६७ कॅलरीज असतात. ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकतो. जर तुम्ही डाएट करत असाल तर याचे सेवन टाळा

4. आंबा

आंबा अनेकाचे आवडते फळ. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर आंबा खाणे टाळा. उन्हाळ्यात एकापेक्षा जास्त आंबे खाणे टाळा. एका आंब्यामध्ये सुमारे १०० कॅलरीज असतात. यासाठी याचे सेवन मर्यादेत करायला हवे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

SCROLL FOR NEXT