Weekly Numerology Saam tv
लाईफस्टाईल

Weekly Numerology : या ३ मूलांकाच्या लोकांचे नशिब पालटणार, नोकरीत मिळेल बढती; तुमचा मूलांक यात आहे का?

Weekly Numerology 2024 : पंचांगानुसार मूलांक १ ते ९ पर्यंत मोजला जातो, जन्मतारखेच्या आधारे जाणून घेऊया १ ते ९ अंक असलेल्या लोकांसाठी जानेवारी हा आठवडा कसा राहील.

कोमल दामुद्रे

Numerology Future Prediction Date Of Birth :

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह, रास, नक्षत्र आणि मूलांकाला अधिक महत्त्व आहे. ज्याप्रमाणे नावाचे पहिले अक्षर राशीची माहिती देते त्या प्रमाणे प्रत्येक जन्मतारखेचा पहिला अंक हा मूलांक तयार करतो.

पंचांगानुसार मूलांक १ ते ९ पर्यंत मोजला जातो, जो जातकाच्या जन्मतारखेनुसार ठरवला जातो. जन्मकुंडलीनुसार जाणून घेऊया अंकशास्त्र हे सर्वात यशस्वी ज्योतिषशास्त्र आहे. संख्या आणि ग्रहांच्या स्थितीच्या संयोगानुसार जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक शुभ संयोग घडतील. जन्मतारखेच्या आधारे जाणून घेऊया १ ते ९ अंक असलेल्या लोकांसाठी जानेवारी हा आठवडा कसा राहील.

1. मूलांक-१

जानेवारीच्या या आठवड्यात मूलांक १ असणारे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग शोधतील. कामाबाबतीत काही ठोस निर्णय घेतील. टीमसोबत काम करतील. आर्थिक (Money) गोष्टीत लाभ होतील.

2. मूलांक-२

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामाबद्दल शंका येऊ शकते. स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात अडचणी येतील. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. गुंतवणूकीवर (Investment) लक्ष केंद्रीत करा. जोडीदाराशी मतभेद होतील.

3. मूलांक-३

संयम ठेवून निर्णय घेतल्यास हा आठवडा अधिक चांगला जाईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात गुंतवणूक करु शकता. वडिलांच्या तब्येतीची (Health) काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अधिक खास असेल.

4. मूलांक-४

कामाच्या ठिकाणी समतोल राखून निर्णय घेतल्यास यश निश्चित मिळेल. वेळेनुसार प्रेम जीवनात शांतता आणेल. जीवनात व्यापकदृष्टीकोन ठेवाल. आईसोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल. आर्थिक खर्च होईल.

5. मूलांक-५

कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. सन्मानही वाढेल. भविष्यात काही निर्णय घेऊ शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

6. मूलांक-६

आर्थिक बाबतीत शुभ संयोग घडतील. आर्थिक लाभ होतील. आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणूकीबाबत चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लक्ष दिल्यास यश मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्याल.

7. मूलांक-७

कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. गुंतवणूकीत चांगला परिणाम मिळेल. प्रेम जीवनात गोडवा येईल. इच्छुकांचे विवाह लवकरच जमतील.

8. मूलांक-८

आर्थिक दृष्टिकोनातून अनेक लाभ होतील. नवीन जॉबच्या संधी मिळतील. एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील.

9. मूलांक-९

अपूर्ण कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत हा आठवडा आनंदी जाईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

SCROLL FOR NEXT