Weak Heart Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Weak Heart Symptoms : तुम्हाला देखील 'ही' लक्षणे जाणवताय ? येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

हृदयाचे आरोग्य हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. याचे मुख्य कारण तणाव, बदललेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होत असते.

कोमल दामुद्रे

Weak Heart Symptoms : कधी कोणत्या क्षणी काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही. चांगल्या दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक हृदयाचा झटका येऊ शकतो. मागच्या काही काळापासून याचा अंदाज अधिकच आपल्याला आला आहे.

खासकरुन ४० पेक्षा जास्त किंवा त्या वयाच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना हृदयाचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढलेली दिसून येत आहे. तुम्हाला देखील हृदयाचे हे संकेत जाणवत असतील तर आपण वेळीच त्याची दखल घ्यायला हवी.

हृदयाचे आरोग्य (Health) हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. याचे मुख्य कारण तणाव, बदललेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होत असते. अचानक चालताना श्वास फुलणे किंवा थोडे जरी काम केले तरी श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांना (Doctor) भेट द्या.

- श्वास फुलण्याकडे दुर्लक्ष करु नका

आपल्या दैनंदिन कामात आपण सारखे दमत असू तर ही चांगली लक्षणे नाहीत बेडरूममधून किचनमध्ये जाताना जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा बसल्यासारखं वाटत असेल तर हे लक्षण म्हणजे तुमचे हृदय कमकुवत आहे. याचा अर्थ तुमचे हृदय नीट पंप करत नाही आणि तुमचे रक्त फुफ्फुसात पर्यत पोहोचत नाही.

- काम करताना छातीत दुखणे

थोडे अंतर चालताना किंवा काही वस्तू उचलताना तुम्हाला छातीत दुखत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

- बेशुद्धीबद्दल सावध रहा

सतत चक्कर येणे किंवा बेशुध्द होणे हे देखील धोकादायक लक्षण आहे. त्यासाठी वेळीच डॉक्टरांना सांगा.

- हात-पाय सुजणे

जर आपले हृदय योग्यरित्या पंप करत नसेल तर हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे. त्यामुळे आपल्या हाताच्या किंवा पायाच्या बोटांना सुज येऊ शकते.

- वाढलेले हृदयाचे ठोके

जर तुमच्या हृदयाचे ठोके अनावश्यकपणे वेगवान होत असतील, तर तुमच्या हृदयाची तपासणी करून घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT