Heart Attack Symptoms : तुम्हाला देखील जाणवताय ही लक्षणे तर वेळीच सावधान व्हा !

बदलेल्या जीवनशैलीनुसार हृदयविकाराचा झटका पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक वाढत आहे.
Heart attack problem in Marathi, heart attack symptoms in Marathi, heart care tips, causes of heart attack
Heart attack problem in Marathi, heart attack symptoms in Marathi, heart care tips, causes of heart attackब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीनुसार हृदयविकाराचा झटका पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक वाढत आहे. कामाचा ताण, घर व थकवा हे याचे मुख्य कारण असू शकते यामुळे त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास वाढू लागला आहे.(Heart attack symptoms in Marathi)

हे देखील पहा -

हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्यानंतर कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होऊन रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते व ते दुर्बल बनतात. तेव्हा आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो. योग्य उपचार लवकर मिळाले नाहीत तर हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते व त्याची कार्यक्षमता कमी होते. हृदयाची रक्तवाहिनी जास्त वेळ बंद राहील तर हृदयाचे जास्त नुकसान होते. जितक्या लवकर हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपचार होतील, त्याप्रमाणात हृदयाच्या स्नायूंची इजा व नुकसान कमी होते. खरेतर हृदयविकाराचा झटका हा पुरूषांसाठी ही एक समस्या होती. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार अमेरिकेत महिला (Womens) व पुरूषांमध्ये मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण हे हृदयविकाराच्या झटक्यामुळे वाढले आहे. यात सायलेंट हृदयविकाराचा झटकासुध्दा आढळून आला आहे. तो कसा येतो हे जाणून घेऊया.(causes of heart attack)

१. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांना अस्वस्थ वाटू लागते. छातीत दुखत असेल, जळजळ होत असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Heart attack problem in Marathi, heart attack symptoms in Marathi, heart care tips, causes of heart attack
Heart Attack : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्वरीत हे काम करा, वाचू शकतो रुग्णाचा जीव

२. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर आपल्याला थकवा जाणवू लागतो. साध्या साध्या गोष्टींमधूनही थकवा येऊ शकतो.

३. काम करताना किंवा चालताना कमजोरी येणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे सामान्य लक्षण आहे.

४. थकवा किंवा छातीत दुखत असेल तेव्हा श्वसनासंबंधित अनेक तक्रारारी उद्भवतात परंतु जेव्हा आपण सरळ बसतो तेव्हा ही लक्षणे कमी होत जातात.

५. सामान्य किंवा अचानक आपल्याला घाम येऊ लागणे, अचानक शरीर थंड पडणे ही हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे आहे.

६. रात्री झोप न येणे, अस्वस्थ वाटणे किंवा दिवसभर थकवा जाणवणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे कारण असू शकते.

७. पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणे किंवा मळमळ होणे ही सर्व हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com