Mumbai Water Fall  Saam TV
लाईफस्टाईल

Mumbai Water Fall : मुंबईमधला वर्षातील १२ महिने वाहणारा धबधबा; 'या' उन्हाळ्यात नक्की भेट द्या

Mumbai Water Fall In Summer : व्हिडिओमध्ये एका मुलीने वर्षाच्या १२ ही महिने वाहणाऱ्या या धबधब्याची महिती दिली आहे. मुंबईपासून १३० किलोमिटर अंतर पार करून तुम्ही येथे पोहचू शकता.

Ruchika Jadhav

मुंबई आणि मुंबईमधील उन्हाळा सर्वांच्याच जीवाची लाहीलाही करतो. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात मुलांना शाळेच्या आणि कॉलेजच्या सुट्ट्या लागल्यात. त्यामुळे सर्वजण आपल्या घराजवळ किंवा अन्य ठिकाणी असलेल्या रिसॉर्टला भेट देत आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का आपल्या मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर उन्हाळ्यातही एक वॉटरफॉल वाहतो.

@its_varshaaa04 या इंस्टाग्राम अकाउंटवर या बाबतचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीने वर्षाच्या १२ ही महिने वाहणाऱ्या या धबधब्याची महिती दिली आहे. कलमांडवी असं या धबधब्याचं नाव आहे. मुंबईपासून १३० किलोमिटर अंतर पार करून तुम्ही येथे पोहचू शकता.

ठिकाण कुठे आहे?

कलमांडवी धबधबा जव्हार येथे आहे. येथे तुम्ही एकट्याने न जाता आपल्या फॅमिलीसोबत किंवा मोठ्या ग्रुपसोबत भेट देऊ शकता. वाहन पार्क केल्यावर पुढे १५ मिनिटे चालत गेल्यावर हा धबधबा लागतो. येथील पाणी प्रचंड खोल आहे.

त्यामुळे सुरक्षीत जॅकेट घालूनच पाण्यात उतरा. मात्र सोलो ट्रिपसाठी ही जागा चांगली नाही, अशी माहिती देखील कॅप्शनमध्ये तरुणीने दिली आहे. धबधबा पाण्याचा झरा पाहायचा असेल तर पावसाची वाट पाहावी लागते. मात्र हा धबधबा अगदी उन्हाळ्यातही वाहत आहे.

तरुणीने मुंबईतलं हे हिडन ठिकाण एक्सप्लोअर केलंय. तसेच याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाठवला आहे. या ठिकाणी फक्त वॉटरफॉल नाही तर काही अॅडवेंचर गेम्स देखील आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही देखील येथे भेट देऊ शकता आणि गरमीपासून क्षणभर विश्रांती घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT