Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

Shreya Maskar

वारंवार झोप येणे

जर तुम्हाला बराच वेळ झोपूनही उठल्यावर थकलेल्यासारखे आणि पुन्हा झोप आल्यासारखे वाटत असेल तर हे हायपरसोम्निया (Hypersomnia) नावाच्या झोपेच्या विकाराचे एक प्रमुख लक्षण आहे.

Frequent sleepiness | pinterest

हायपरसोम्निया म्हणजे काय?

हायपरसोम्निया हा एक झोपेचा विकार आहे, ज्यामध्ये रात्री पुरेशी झोप होऊनही दिवसा खूप जास्त झोप येते आणि जागे राहणे कठीण होते. जेव्हा तुम्ही १०-१२ तास झोपूनही तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला झोपेचे प्रमाण मिळत आहे, पण गुणवत्ता नाही. यासाठी झोपताना मन शांत असणे खूपच गरजेचे आहे.

What is Hypersomnia? | pinterest

स्लीप ॲप्निया

स्लीप ॲप्निया (Sleep Apnea) हा एक गंभीर झोपेचा विकार आहे, ज्यामध्ये व्यक्ती झोपेत असताना तिचा श्वास बारम्बार थांबतो आणि सुरू होतो.

Sleep apnea | pinterest

झोपेत येतो अडथळा

स्लीप ॲप्निया या आजारात श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे शरीराला आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. झोपेत श्वास थांबल्यामुळे मेंदू तात्पुरता जागा होतो, जेणेकरून श्वास पुन्हा सुरू व्हावा. यामुळे गाढ आणि शांत झोप मिळत नाही.

Sleep is interrupted | pinterest

मधुमेह

रक्तातील साखरेची पातळी जास्त किंवा कमी-जास्त झाल्यामुळे पेशींच्या ऊर्जा निर्मितीत अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे विश्रांती घेऊनही तुम्हाला सतत अशक्त आणि सुस्त वाटू शकते.

Diabetes | pinterest

मानसिक आरोग्य

नैराश्यामुळे मेंदूतील रासायनिक बदल होतात आणि झोपेच्या रचनेवर त्याचा खोलवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा 'हायपरसोम्निया' (अति झोप) होतो. हायपरसोम्नियामध्ये रात्री पुरेशी झोप होऊनही दिवसा खूप जास्त झोप येते आणि जागे राहणे कठीण होते.

mental health | pinterest

ॲनिमिया

ॲनिमियामध्ये शरीरात लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे झोपेच्या गंभीर समस्या निर्माण होतात.

Anemia | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Poha Side Effects | AI PHOTO
येथे क्लिक करा...