Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Shreya Maskar

पोह्यांचा नाश्ता

सर्व सामान्यांच्या घरी बनला जाणारा पोहे हा नाश्ता टेस्टी, झटपट होणारा असला तरी त्याचे अति सेवन आरोग्यास हानिकारक आहे. ज्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

Poha | pinterest

रक्तातील साखरेत वाढ

पोहे तांदळापासून बनतात, ज्यामध्ये कर्बोदके भरपूर असतात. ते वारंवार खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी याचे रोजचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

blood sugar | pinterest

ॲसिडिटी- अपचन

प्रक्रिया केलेले पोहे संवेदनशील पोटासाठी जड ठरू शकतात. जास्त प्रमाणात खाल्ल्याने छातीत जळजळ, ॲसिड रिफ्लक्स आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

Acidity | pinterest

पचनसंस्थेवर ताण

कच्चे पोहे खाल्ल्याने काही लोकांमध्ये आतड्यांची हालचाल मंदावू शकते. जर तुमची पचनसंस्था आधीच मंद असेल, तर यामुळे बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते.

digestive | pinterest

वजन वाढणे

पोह्याच्या पदार्थांमध्ये अनेकदा तळलेले शेंगदाणे, शेव आणि बटाटे यांसारखे जड घटक असतात. रोजच्या आहारात अशा प्रकारे अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज घेतल्यास वजन वाढू शकते.

weight gain | pinterest

लवकर भूक लागते

पोह्यांमध्ये दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचा अभाव असतो. शरीर याचे पचन खूप वेगाने करत असल्याने, खाल्ल्यानंतर अवघ्या एक-दोन तासांतच तुमची ऊर्जा कमी होऊ शकते आणि पुन्हा भूक लागू शकते.

Get hungry early | pinterest

लोहाचे प्रमाण जास्त

पोह्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. शरीरात लोहाचे प्रमाण जास्त झाल्यास उलट्या, जुलाब आणि तीव्र निर्जलीकरण होते.

High in iron | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Urine Infection | AI PHOTO
येथे क्लिक करा...