Water Saving  Saam Tv
लाईफस्टाईल

Water Saving : दररोज 600 लीटर पाण्याची करतात बचत, बंगळुरूच्या डॉक्टरांची कमाल! पाणीबचतीसाठी शेअर केल्या टिप्स

How To Save Water : एप्रिल सुरू होण्यापूर्वीच पाण्याच्याबाबतीत अनेक बातम्या ऐकण्यात येत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई होते. पाणी टंचाई ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेक लोक पाणी टंचाई होऊ नये यासाठी अनेक ट्रिक्स ट्राय करत असतात.

Shraddha Thik

Tips For Save Water :

एप्रिल सुरू होण्यापूर्वीच पाण्याच्याबाबतीत अनेक बातम्या ऐकण्यात येत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई होते. पाणी टंचाई ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेक लोक पाणी (Water) टंचाई होऊ नये यासाठी अनेक ट्रिक्स ट्राय करत असतात. तसाच काहीसा प्रयत्न बंगळूरूमधील एका डॉक्टरने केला आहे.

बंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या (Problems) होते. तसेच काही लोक कडाक्याच्या उन्हाळ्यात शॉवरचा वापर करतात. याचे सोल्यूशन म्हणून डॉक्टर दिव्या शर्मा यांनी काही टीप्स शेअर केल्या आहेत. या टीप्समार्फत त्यांना एका दिवशी तब्बल 600 लीटर पाण्याची बचत केली आहे. त्यांच्या कुटुंबात चार जणांच्या दैनंदिन जीवनशैलीवर (Lifestyle) कोणताही परिणाम न होता दररोज पाण्याची बचत करता येते असे डॉक्टर म्हणतात.

बंगळुरूमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिव्या शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर काही टिप्स शेअर केल्या आहेत त्या जाणून घेऊयात

ओव्हरहेड शॉवर करू नका

डॉक्टर दिव्या शर्मा यांनी बकेट बाथ घेण्याचे सुचवले आहे. त्यांनी स्पष्ट केले की जास्त वेळ ओव्हरहेड शॉवर वापरल्याने तुमची त्वचा लवकर कोरडी होऊ शकते आणि एक्जिमा नावाचा वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पाण्याची टंचाई होण्यास आणि आपली त्वचाही निरोगी ठेवण्यास मदत करते.

नळांवर एरेटर लावा

डॉक्टर दिव्या शर्मा सांगतात की, सर्व नळांवर एरेटर बसवा आणि यामुळे 30 मिनिटांची डिशवॉशिंग दरम्यान पाण्याचा वापर 450 ते 90 लीटरपर्यंत कमी होईल.

सांडपाण्याचा पून्हा वापर (RO)

डॉक्टर दिव्या शर्मा यांनी सांगितले, पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्यासाठी RO पद्धत वापरा.

RO कसे कार्य करते?

घरात वापरले जाणारे पाणी मोपिंग आणि बागकामासाठी साठवू शकता. यामुळे दररोज 30 लीटर पाण्याची बचत होईल असा अंदाज आहे.

एक छोटे पाऊल, मोठा प्रभाव

वॉशिंग मशिनच्या वापरासाठी खूप पाणी लागते त्यासाठी ती वापरणे टाळले पाहिजे. यामुळे तुम्ही 600 लीटर पाण्याची बचत होईल.

अशा प्रकारच्या टीप्स फॉलो करून तुम्ही दिवसाला 600 लीटर पाण्याचे बचाव करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT