Shraddha Thik
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आरोग्याला बरेच फायदे आहेत. तसेच त्याचे नियम आहेत, ते जाणून घ्या...
पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या भांड्याना सध्या लोक ट्रेंड म्हणून वापरले जाते.
ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पिणार आहात ते भांडे शुद्ध तांब्यापासून बनवलेले तसेच स्वच्छ असायला हवे.
तांब्याच्या भांड्याच्या आत मधल्या आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूने तांबे वापरलेले हवे कुठलाही दुसरा धातू त्यामध्ये मिक्स नसावे.
भांडे स्वच्छ घासून घेतलेले असावे. भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा वापर करू शकता.
लिंबू सरबत किंवा कुठलेही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नये कारण हे ऍसिडिक असतात. ज्यामुळे तांब्याचे भांडे आणि ऍसिडिक पदार्थ यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्या शरीरासाठी घातक असे रसायन तयार होते.
रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये काही दिवस पाणी प्यायल्या नंतर काही दिवसाचा गॅप ठेवावा.