Shraddha Thik
दातांना किड लागणे ही एक सामान्य समस्या आहे.
तसेच आपल्या ओरल हायजिन खराब असणे या गोष्टी खाण्या-पिण्याच्या अनियमतेमुळेही होते. अशा कारणांमुळे दातांना किड लागण्याची शक्यता आहे.
दातांच्या समस्येमुळे फक्त दात किडत नाहीत तर वेदनाही जाणवतात. दातांमध्ये वेदना जाणवणं अनेकदा असहय्य होतं. दातांतील किड काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.
2 चमचे नारळाच्या तेलात 2 ते 3 थेंब लवंगाचे तेल घाला. एका स्वच्छ वाटीत नारळाचे तेल काढून घ्या. हे मिश्रण दात आणि हिरड्यांना लावा. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तसंच लावून ठेवा.
त्यानंतर तोंड स्वच्छ करून पाण्याने गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसभरातून 2 वेळा करा. ज्यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
नारळाच्या तेलात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास मदत होते.
लवंगाचे तेल वेदना निवारक आणि एंटी सेप्टीक गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे दातांतील संक्रमण कमी होण्यास मदत होते.