EPFO
EPFO  Saam Tv
लाईफस्टाईल

EPFO Withdraw Rules: नोकरी बदलल्यानंतर लगेच पीएफ काढायचा आहे ? आधी EPFO चे नियम वाचा, अन्यथा पैसे जातील पाण्यात...

कोमल दामुद्रे

EPFO Withdrawal Rules : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरकारकडून प्रोव्हिडंन्ट फंडच्या स्वरुपात दरमाहा त्यांच्या पगारातील 12 टक्के रक्कम साठवली जाते. जेव्हा तुम्ही ती नोकरी सोडता किंवा रिटायर्ड होता तेव्हा तुम्हाला हे साठवलेले पैसे वापरण्याची मुभा असते.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पीएफ अत्यंत महत्त्वाचा असतो. पण तुम्ही पीएफच्या बाबतीत करत असलेल्या या चुकांमुळे तुम्हाला आर्थिक (Money) नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. नेमक्या आपण काय चुका करतो व त्या कशाप्रकारे टाळता येऊ शकतात जाणून घेऊया सविस्तर

जर तुम्ही खाजगी कंपनीत नोकरी (Job) करत असाल आणि नोकरी बदलून आपल्या पीएफ खात्यात साठवलेली सगळी रक्कम काढण्याचा विचार करत असाल तर थांबा आपले नुकसान होऊ शकते. असे केल्यास तुम्ही साठवलेली मोठी रक्कम आणि साठवणुकीवर आर्थिकदृष्ट्या परिणाम होऊ शकतो.

एवढेच काय पेन्शनही दीर्घकाळापर्यंत सुरू राहू शकणार नाही. त्यामुळे असे करण्याआधी तुमच्याकडे नोकरी असणे गरजेचे असते. तुम्ही एकतर नव्या कंपनीला जॉइन होऊ शकता किंवा आपल्या आधीच्या कंपनीत पुन्हा रुजू होऊ शकता. यामुळे तुमचा पीएफ (Pf) सतत चालू राहील. निवृत्तीनंतर देखील तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही आपल्या पीएफला काही काळासाठी तसेच ठेवू शकता.

काही परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्यास कामावरून काढण्यात येते किंवा तो नोकरी सोडून गेला तरी तो आपले पीएफ खाते काही वर्षांसाठी कंपनीत ठेवू शकतो व त्यावर कंपनीकडून व्याज देखील मिळू शकते. त्यामुळे नोकरी सोडल्यावर लगेच पीएफ काढून घेतल्याने तुमचे आर्थिक नुकसान होते. जरी नोकरी सोडायची असल्यास नवी नोकरी लागताच पीएफला तुम्ही ट्रान्सफर करून तुम्ही तुमची साठवणूक कायमची सुरू ठेवू शकता.

1. कंपनीकडून मिळते 3 वर्षांसाठी व्याज

तुम्ही नोकरी सोडल्यावर तुमच्या पीएफला 36 महिने म्हणजेच 3 वर्षांपर्यंत व्याज मिळते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जर तुम्ही 36 महिन्यांत खात्यात पैसे जमा केले नाही तर तर तुमचे पीएफखाते निष्क्रिय मानले जाऊ शकते. असे होण्यापासून टाळण्यासाठी 3 वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्या खात्यातून निदान थोडीतरी रक्कम काढावी जेणेकरून तुमचे खाते सुरू राहील.

2. पीएफ रक्कमेवर व्याज करपात्र आहे का ?

नियमांनुसार, पाहायला गेले तर खात्यात पैसे न भरल्यास खाते निष्क्रिय होत नाही परंतु, नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या व्याजावर कर लागू होतो. जर पीएफ खाते निष्क्रिय होऊन देखील जर रक्कम गोळा केली नाही तर ती संपूर्ण रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत जमा होते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT