Yoga Tips : हाय कॉलेस्ट्रॉलमुळे(cholesterol) अनेक आजार उद्भवु शकतात. वाढलेले कॉलेस्ट्रॉल कसे कमी करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. कॉलेस्ट्रॉल हे एक नैसर्गिक शरीरातील चरबी असते, ती शरीरातच तयार होते. परंतु जर शरीरातील (Health) कॉलेस्ट्रॉलची पातळी जास्त प्रमाणात वाढली तर आपल्याला मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांसारखे आजार शरीराला घेरतात.
हाय कॉलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की फास्ट फूड, तेलकट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट आणि अल्कोहोल इत्यादींचा वापर. सध्या लोकांच्या दिवसाची सुरूवातच ऑफिसपासून होते आणि दिवसही कार्यालयातच संपतो. त्याठिकाणी काहीही शारीरिक श्रम करणे शक्य नसते. त्यामुळे हाय कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका अधिक असतो. चला जाणून घेऊया असेच काही योगासने ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो.
अनुलोम-विलोम प्राणायाम करण्यासाठी प्रथम वज्रासनाच्या स्थितीत बसा आणि उजवा हात वर करून नाकपुडी बंद करा. नंतर दीर्घ श्वास घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडा. तीच प्रक्रिया डाव्या हाताने नाकाच्या दुसऱ्या बाजूला करा. हा प्राणायाम किमान ५ ते ६ मिनिटे करा.
शलभासनासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा, दोन्ही पाय सरळ ठेवा आणि पायाची बोटे पुढे करा. तसेच, आपल्या हातांची मुठी बनवा आणि आपल्या पायच्या मांडीखाली दाबा. नेहमी लक्षात ठेवा की, तोंड सरळ आणि डोळे समोर सरळ हवेत. आता आपले पाय शक्य तितके उंच करण्याचा प्रयत्न करा, नंतर हळूहळू श्वास सोडा आणि पाय खाली आणा. हा व्यायाम किमान ४ ते ५ वेळा पुन्हा करा.
चक्रासनासाठी पाठीवर झोपा आणि दोन्ही हात आणि पाय सरळ ठेवा. पाय गुडघ्यातून वाकवून मागच्या बाजूला घ्या आणि दोन्ही हात वर उचला आणि त्यावर वजन टाका आणि कोपर सरळ ठेवा. आता हात आणि पाय पूर्णपणे सरळ करा आणि शक्य तितक्या वेळ करत रहा. शेवटी, आसन करताना, दीर्घ श्वास घ्या आणि परत त्याच स्थितीत या.
टिप - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.