Natural Remedies google
लाईफस्टाईल

Fatty Liver: लिव्हर हेल्दी ठेवायचंय? मग आहारात करा या ३ फूडचा समावेश, नॅचरली कमी होईल फॅट

Natural Remedies: लिव्हरचं आरोग्य टिकवण्यासाठी आहारात हे ३ नैसर्गिक फूड कॉम्बोज समाविष्ट करा. हे संयोजन फॅट कमी करतं, पचन सुधारतं आणि लिव्हरला नैसर्गिकरीत्या मजबूत बनवतं.

Sakshi Sunil Jadhav

लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी योग्य आहार पुरेसा आहे.

काही नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने अनेक समस्याने दूर होतात.

दररोजच्या आहारात यांचा समावेश केल्यास लिव्हरचं आरोग्य दीर्घकाळ टिकतं.

लिव्हर म्हणजे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव जो रक्त शुद्ध करतो, विषारी घटक बाहेर टाकतो आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतो. मात्र चुकीच्या आहारामुळे आणि अयोग्य जीवनशैलीमुळे लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो आणि फॅट जमा होऊ लागतो. त्यामुळे लिव्हरचं आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार घेणं खूप महत्वाचं आहे.

कधी कधी आरोग्यदायी अन्न खाणं कंटाळवाणं वाटतं, पण काही नैसर्गिक फूड कॉम्बोज असे आहेत जे चवदारही आहेत आणि लिव्हरला हेल्दी ठेवतात. हे फूड्स सूज कमी करतात, लिव्हरच्या पेशींना सुरक्षित ठेवून आणि पचन सुधारतात.

पहिला कॉम्बो

पहिला कॉम्बो म्हणजे खजूर आणि अक्रोड. जे लोकांना नेहमी काहीतरी गोड खायचं वाटतं त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. खजूर अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून तुम्हाला वाचवतात. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात, जे लिव्हरमधील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात.

दुसरा कॉम्बो

दुसरा कॉम्बो आहे सॉकरक्राउट आणि फर्मेंटेड पिकल्स. हे पदार्थ लिव्हर आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. हे फूड्स गुड बॅक्टेरिया म्हणजेच चांगल्या जीवाणूंचं प्रमाण वाढवतात आणि फॅटी लिव्हरशी लढण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरीत्या बाहेर पडतात.

तिसरा कॉम्बो

तिसरा आणि स्वादिष्ट कॉम्बो म्हणजे डार्क चॉकलेट आणि मिक्स्ड नट्स. मिक्स्ड नट्समध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, तर डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे लिव्हरच्या पेशींचं संरक्षण करतात. डॉक्टरांच्या मते, हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास ते स्वादिष्ट आणि आरोग्यदायी संयोजन ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT