Healthy kidney tips Yandex
लाईफस्टाईल

Kidney Health: किडनीला निरोगी ठेवायचंय? 'या' सवयींचं करा पालन, राहा निरोगी

Healthy kidney tips: किडनी हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे किडनीचं आरोग्य जपलं पाहिजे. किडनीचं आरोग्य जपण्यासाठी काही खास टीप्स आहेत, त्या जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. किडनीचं कार्य उत्तम राहावं यासाठी हायड्रेट राहणं, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं तसंच व्यायाम करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. संतुलित आहार सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे सेवन मर्यादित करून मूत्रपिंडावरील ताण कमी होऊ शकतो.

दरम्यान चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे देखील किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. किडनीचं आरोग्य जपण्यासाठी काही खास टीप्स आहेत, ज्या प्रत्येकाने फॉलो केल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची किडनी हेल्दी राहण्यास मदत होणार आहे.

हेल्दी फूड

किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या आहारात धान्य, भाज्या आणि फळांचा समावेश करावा. जितक्या गोष्टी तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये सेवन कराल तितकं तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

चांगली झोप

झोपेच्या कमतरतेमुळे हायपरटेंशन आणि मधुमेहासारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते. या समस्या तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी रिस्क फॅक्टर मानल्या जातात. झोपण्याच्या वेळी आपली किडनी अधिक प्रमाणात रक्त फिल्टर करू शकते आणि जास्त लघवी तयार करते. याचाच अर्थ एक्स्ट्रा फ्लूइड आणि टॉक्सिक गोष्टी शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे किडनीचं आरोग्य अधिक चांगलं ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

पेनकिलरपासून दूर राहा

पेनकिलर्सचं अतिप्रमाणत सेवन करणं धोकादायक ठरू शकतं. काही पेनकिलर किडनीच्या रक्तप्रवाहावर परिणाम करतात. जर कोणा व्यक्तीला पहिल्यापासूनच किडनीशी संबंधित काही समस्या असतील तर अशा व्यक्तींनी पेनकिलरपासून दूर रहावं.

अतिप्रमाणत मिठाचं सेवन टाळावं

शरीरात मिठाचं संतुलन राखण्यासाठी किडनी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशावेळी जेव्हाही शरीरात अतिरिक्त मीठ असेल तर ते शरीरातून काढून टाकण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते. म्हणून मिठाचं जास्त सेवन करू नये.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

तुम्ही कूलर वापरताय? सावधान ! कूलरनं घेतला चिमुकल्याचा बळी

CJI Surya Kant: बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात, सरन्यायाधीश सूर्यकांत का संतापले?

SCROLL FOR NEXT