Brain improvement exercises saam tv
लाईफस्टाईल

Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा

Focus enhancement exercises: आजच्या धावपळीच्या जीवनात स्मरणशक्ती कमी होणे किंवा एकाग्रता साधता न येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तणाव, अपुरी झोप आणि बैठी जीवनशैली यामुळे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

Surabhi Jayashree Jagdish

जसं शरीर फीट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा असतो. त्याचप्रमाणे तसंच मेंदू तंदरुस्त ठेवण्यासाठीही मानसिक व्यायाम म्हणजेच ब्रेन एक्सरसाईजेस तितकाच महत्त्वाचा आहे. काही पद्धतीचे व्यायाम तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकूणच मेंदूचं कामकाज सुधारण्यास मदत करतात.

CARE रूग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. मुरली कृष्णा यांच्या मतानुसार, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच्या 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' वर काम करणं गरजेचं आहे. न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे मेंदूच्या नव्या पेशींमध्ये नवं कनेक्शन्स तयार होण्याची क्षमता. वयोमानानुसार, आपल्या शरीरात काही बदल घडतात. त्यामुळे ब्रेन एक्सरसाईज गरजेचे असतात.

का गरजेचा आहे मेंदूचा व्यायाम?

न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे काय?

मेंदू हा एक असा अवयव आहे जो सतत नवीन शिकत असतो. आपण काही नवं शिकतो, विचार करतो, समस्यांवर उपाय शोधतो त्यावेळी मेंदू नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करतो. यामुळे आपली शिकण्याची क्षमता तसंच स्मरणशक्ती आणि वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद वाढण्यास मदत होते.

वयासोबत मेंदूचं कार्य हळू होतं

वय वाढत गेलं की मेंदूचं काम कमी होऊ लागतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावेळी स्मरणशक्ती कमी होते, गोष्टी लक्षात राहत नाहीत, विचार करणं मंदावतं. पण जर नियमित मानसिक व्यायाम केला, तर मेंदू एक्टिव्ह राहण्यास मदत होते.

एकाग्रता वाढते

मेंटल वर्कआउट केल्याने मनाला स्थिर ठेवण्याची आणि कामावर लक्ष केंद्रीत करण्याची ताकद वाढण्यास मदत होते.

स्मरणशक्तीला चालना

शरीराच्या स्नायूंप्रमाणेच मेंदूही सरावामुळे अधिक मजबूत होतो. नवीन गोष्टी लक्षात ठेवणं, त्याचा उपयोग करणं, जुनी माहिती आठवणं या सगळ्या बाबतींत सुधारणा होण्यास मदत होते.

कोणते ३ ब्रेनचे एक्सरसाईज करावेत?

मेडिटेशन

ध्यान, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या विचारांवर सजगपणे नजर ठेवणं हे सगळं मेडिटेशनच्या अंतर्गत येतं. यामध्ये तुमच्या मनाला स्थिर ठेवण्याचा सराव होतो. मुळात ध्यान केल्याने मेंदूतील हिपोकॅम्पस आणि प्री-फ्रंटल कॉर्टेक्स या भागांचं कार्य सुधारतं. हे घटक लक्ष आणि आठवणींसाठी महत्त्वाचे असतात.

काय फायदे मिळतात?

  • ध्यानाने एकाग्रता वाढते

  • तणाव कमी होतो

  • स्मरणशक्ती सुधारते.

मेमरी गेम्स

स्मरणशक्ती आणि लॉजिकल विचार यांच्यासंबंधीचे खेळ, कोडी किंवा पझल्स सोडवणं यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये नवे कनेक्शन तयार होतात.

काय फायदे मिळतात?

  • अल्पकालीन स्मरणशक्ती सुधारते

  • विचारांची लवचिकता (cognitive flexibility) वाढतं

  • मेंदू सतत अ‍ॅक्टिव्ह राहतो

नवीन कौशल्य किंवा भाषा शिकणं

नवीन काही शिकल्यावर मेंदूला नवीन माहिती साठवावी लागते. यासाठी मेंदूला एक प्रक्रिया करावी लागते. यामुळे नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतात.

काय फायदे मिळतात?

  • नवीन गोष्टी शिकताना मेंदूचा वेग वाढतो

  • लक्ष केंद्रित करण्याची ताकद वाढते

  • माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारते

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

SCROLL FOR NEXT