Manasvi Choudhary
मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात अनेक प्रथा पद्धती पाळल्या जातात.
मार्गशीर्ष महिना हा माता महालक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. या महिन्यात अनेक भक्त महालक्ष्मीचे व्रत करतात आणि श्रीकृष्णाची पूजा करतात.
मार्गशीर्ष महिन्यात मासांहार का करत नाहीत यामागचे नेमके कारण काय? जाणून घेऊया.
मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरूवारला महत्व आहे.प्रत्येक गुरूवाती मार्गशीर्ष व्रताची पूजा करतात.
मार्गशीर्ष महिन्यात मासांहार करू नये असे तुम्ही घरातील मंडळीकडून सांगितले जाते. मार्गशीर्ष महिन्यात मासांहार करणे वर्ज्य असते या महिन्यात देवीचे व्रत पाळले जाते.
हा महिना भक्ती आणि पवित्रतेचा काळ मानला जातो. व्रते आणि पूजा-अर्चेच्या वेळी सात्विक आहार घेणे आवश्यक असते.
सात्विक आहारामुळे मन शांत आणि शुद्ध राहते, जे भक्ती आणि उपासनेसाठी अनुकूल असते. त्यामुळे मन शुद्ध ठेवण्यासाठी या महिन्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.