Manasvi Choudhary
अनेकांना रोजच्या जेवणात कडधान्य खायल आवडतात. मोड आलेल्या कडधान्ये चविष्ट लागतात. तुम्ही या कडधान्याची रस्सा व सुकी भाजी देखील बनवू शकता.
हिरव्या मुगाची मिरची टाकून केलेली भाजी चवीला स्वादिष्ट लागते. भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
अनेकजण हिरव्या मुगाची सुखी भाजी आवडीने खातात. प्रत्येकांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहींना मुगाची रस्सा भाजी आवडते.
हिरव्या मुगाची सुकी भाजी बनवण्यासाठी मोड आलेले हिरवे मूग, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, आले- लसूण पेस्ट, हळद, मसाला, धना पावडर, मीठ, ओले खोबरे, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे फोडणीसाठी घाला नंतर त्यात कढीपत्ता मिक्स करा.
बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये घाला सोनेरी रंग येईपर्यत चांगला परतून घ्या. या मिश्रणात आले- लसूण पेस्ट मिक्स करा. टोमॅटो घालून मिश्रण शिजवून घ्या.
मिश्रणात हळद, मसाला, धनापावडर हे मसाले घालून चांगले मिक्स करा. कढईमध्ये मूग आणि चवीनुसार मीठ घाला.
भाजी चांगली शिजवण्यासाठी त्यावर झाकण घाला, भाजी शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घाला.