Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला कुरकुरीत खायचं असेल तर तुम्ही पालकची भजी बनवू शकता. पालकची भाजी खायला अनेकांना कंटाळा येतो.
पालकची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ती अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
पालक भजी बनवण्यासाठी तुम्हाला पालक, बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आलं - लसूण पेस्ट, मीठ, हळद, मसाला, धने पावडर, तेल हे साहित्य घ्यायचे आहे.
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवा त्यानंतर त्याची पाने चिरून घ्या. चिरलेली पालकची पाने पुन्हा एकदा स्वच्छ धुवा.
एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल मसाला, धने- जीरा पावडर हे मसाले एकत्र करा. नंतर या मिश्रणात थोडे थोडे पाणी घाला आणि मसाला तयार करा.
तयार मिश्रणात चिरलेला पालक, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट मिक्स करा. मिश्रणात चवीनुसार मीठ घाला. गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये पालकच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे सोडा.
गॅसवर मध्यम आचेवर ही भजी सोनेरी रंग होईपर्यत तळून घ्या नंतर ही भजी एका प्लेटमध्ये थंड करा. अशाप्रकारे गरमागरम पालकची भजी सर्व्हसाठी तयार आहेत.