Manasvi Choudhary
व्हेज पुलाव खायला सर्वांनाच आवडते. हॉटेलला गेल्यानंतर व्हेज पुलाव राईस हा ऑर्डर केला जातो. मात्र घरी हॉटेलसारखा राईस बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सोपी रेसिपी सांगणार आहोत.
मिक्स भाज्यांपासून तुम्हाला व्हेज पुलाव बनवायचा आहे. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे जी तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता.
व्हेज पुलाव बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ, कांदा, भाज्या, तेल किंवा तूप, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेजपत्ता, लवंग, वेलची, दालचिनी, जीरे हे साहित्य घ्यायचे आहे.
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून ते अर्धातास भिजत घालायचे आहे. यानंतर तांदळातील पाणी काढून टाका.
गॅसवर कढईत तेल किंवा तूपामध्ये जीरे आणि खडे मसाले यांची फोडणी द्या म्हणजेत चांगला सुगंध येईल.
नंतर यात कांदा घाला आणि सोनेरी रंग होईपर्यत परतून घ्या. नंतर त्यात आलं- लसूण पेस्ट घाला. संपूर्ण मिश्रण एकदा चांगले परतून घ्या.
मिश्रणात भाज्या चिरून घाला. भाज्या हलक्या शिजल्यानंतर यात तुम्ही मसाला, हळद, पुलाव मसाला मिक्स करा.
आता या मिश्रणात तांदूळ मिक्स करा आणि हलक्या हाताने परतून घ्या आणि पुलाव शिजवून घ्या.
पुलाव शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि पुलाव मोकळा करा. अशाप्रकारे गरमा गरम पुलाव सर्व्हसाठी रेडी असेल.