Manasvi Choudhary
सिमला मिरची ही भाजी अनेकांना खायला आवडत नाही. मात्र सिमला मिरची ही विविध पदार्थमध्ये टाकल्यास चविष्ट लागते.
यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सिमला मिरचीचा झुणका कसा बनवायचा?सिमला मिरची आणि बेसनापासून हा खास झुणका बनवला जातो. अत्यंत चविष्ट अशी ही रेसिपी सर्वजण आवडीने खातात.
सिमला मिरची झुणका बनवण्यासाठी सिमला मिरची, बेसन, तेल , मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि मसाला हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम सिमला मिरची झुणका बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवा त्यात तेल गरम करा.
तेलामध्ये मोहरी, जिरे आणि हिंगाडी फोडणी द्या त्यानंतर या मिश्रणात सिमला मिरची बारीक कापून घाला ती परतून घ्या.
शिमला मिरची शिजल्यानंतर त्यात बेसन, हळद, मसाला मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण परतून घ्या. सिमला मिरचीच्या तयार मिश्रणाचे गुटळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
भाजी तयार होताना त्यावर झाकण ठेवा. साधारणपणे अर्धातासाने भाजीचे झाकण काढा.
अशाप्रकारे काही मिनिटांतच तुमची सिमला मिरची स्पेशल झुणका सर्व्हसाठी रेडी असेल ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही, ते देखील बेसनामुळे या झुणक्याची चव चाटून पुसून खातील.