Manasvi Choudhary
लोहगड किल्ला महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. लोहगड किल्ल्यावरून जुना इतिहास वारसा लाभलेला आहे.
पुण्याच्या दिशेने जाताना लोणावळ्याजवळ हा किल्ला वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३, ३८९ फूट उंचीवर हा किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते.
किल्ल्यावर चढण्यासाठी सुमारे २५० ते ३०० पायऱ्या आहेत. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी चार भव्य दरवाजे आहेत, जे आजही मोठ्या प्रमाणात सुस्थितीत आहेत.
किल्ल्यांच्या दरवाज्यांना गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा अशी नावे आहेत. महा दरवाजा या दरवाज्यांवर सुंदर नक्षीकाम आणि दगडी बांधकाम केलेले आहे.
लोहगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि पावसाळा तसेच हिवाळ्यात भेट देतात.किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग अत्यंत सोपा असल्याने ट्रेकर्सप्रेमी लोहगड किल्ल्याला भेट देतात.
किल्ल्याच्या माथ्यावरून विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगा आणि पवना धरणाचे मनमोहक दृश्य दिसते. पावसाळ्यात येथील हिरवळ आणि धबधबे ट्रेकिंगचा अनुभव अविस्मरणीय बनवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.