Manasvi Choudhary
रायगड जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेला सिंगापूरमार्गे लिंगाणा हा किल्ला हे पर्यटकांचे प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक पर्यटक लिगांणा किल्ला येथे ट्रेकिंगसाठी येतात.
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. मानगड, सोनगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाच्या घाटावर वसलेला आहे.
लिंगाणा किल्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मोऱ्यांचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ लिंगाणा किल्ला बांधला.
शिवलिंगाच्या आकाराचा हा किल्ला असल्याने त्याचे नाव लिंगाणा असे पडले आहे. रायगड हा राजगृह तर लिंगाणा हे कारागृह म्हणून ओळखले जाऊ लागले.
लिंगाणा किल्ल्यावर स्वराज्यांच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत येथे गुहेत कारागृह आहेत ज्यामध्ये एका वेळेस ५० कैदी ठेवत. लिंगाणा किल्ल्याला 'स्वराज्याचा कारागृह' अशी ओळख आहे. येथे स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत.
लिंगाणा किल्ल्याची वाट अवघड आणि घसरडी असल्याने, कैदी येथे ठेवल्यानंतर पळून जाण्याचा विचार करत नव्हते. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद व्हायच्या.