Sakshi Sunil Jadhav
थंडीच्या दिवसांत सर्वजण गरम पाण्याने अंघोळ करणं पसंत करतात. पण गरम पाण्याने अंघोळ करूनसुद्धा बाहेर पडल्यानंतर लगेच थंडी वाजते. अनेकांना हा अनुभव रोज येतो. यामागे काही वैज्ञानिक कारणं लपलेली आहेत.
पुढे आपण जाणून घेणार आहोत की, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर थंडी का वाजते? यामागची महत्वाची कारणे.
गरम पाण्यामुळे त्वचेची रोमछिद्रे उघडतात आणि त्वचा उष्णता जलद गमावू लागते. त्यामुळे थंडी जास्त जाणवते.
गरम पाण्याच्या सवयीमुळे शरीराचं तापमान वाढतं, पण बाथरूमच्या बाहेर थंड हवा लागताच शरीराला थंडी वाजायला सुरुवात होते.
त्वचेवरील पाणी बाष्पीभवन होत असताना त्वचेतील उष्णता घेऊन जातं, त्यामुळे शरीर थंड पडतं.
थंडीत शरीरातील रक्तवाहिन्या संकुचित होतात, त्यामुळे थंडी जास्त जाणवते. यामध्ये गरम पाण्याने अंघोळ केली तरी चालते.
त्वचेतील नैसर्गिक तेलं कमी झाल्याने थंडी आणि कोरडेपणा जास्त जाणवतो. बाहेरच्या हवेत आर्द्रता कमी असल्याने शरीर उष्णता कमी देते आणि थंडी जाणवते.
अचानक थंड वारा लागणे हे थंडी वाढवणारं प्रमुख कारण आहे. गरम वातावरणातून थंडीत येताना शरीराला अॅडजस्ट होण्यासाठी काही मिनिटं लागतात.
काही लोकांमध्ये थोड्या तापमान बदलानेही थंडी पटकन चढते, विशेषतः कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना ही समस्या जास्त जाणवते.