Kitchen Hacks
Kitchen Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : तेलकट व चिवट डब्यांवरचे डाग घालवायचे आहे ? चहापत्ती ठरेल फायदेशीर !

कोमल दामुद्रे

Kitchen Hacks : प्रत्येक स्त्रीला आपले स्वयंपाकघर अत्यंत प्रिय असते. ज्या स्त्रिया गृहिणी असतात त्यांना तर त्यांचे स्वयंपाक घर स्वच्छ ठेवायला फार आवडते. ज्या ठिकाणी आपण अन्न बनवतो ती जागा स्वच्छ आणि स्वयंपाक घरातील भांडी देखील स्वच्छ असावी लागतात.

किचनमध्ये अधिक खराब झालेले डब्बे असतात पण ते कितीही घासले तरीही साफ होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला खास टिप सांगणार आहोत. जेणेकरून तुमचे डब्बे नव्यासारखे चमकतील.

स्वयंपाकघर (Kitchen) कितीही साफ (Clean) ठेवण्याचा प्रयत्न केला तरी. काही दिवसांनी पुन्हा डब्ब्यांवर धूळ बसते आणि डब्बे चीपचीपे होतात. त्याचबरोबर मांडणीमधील भांड्यांवर देखील धूळ बसते. घरातील सगळ्या डब्ब्यांवरती तेलाचे (Oil) डाग किंवा चीपचीपपणा आलेला असतो. या डब्ब्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचा चिवटपणा वाढत जाईल.

त्याचबरोबर तो चिवटपणा काढण्यासाठी निदान एक तास तरी डब्बे घासत बसावं लागेल. जर तुमच्या किचनमध्ये देखील अशे चिवट डब्बे असतील. तर ते साफ करण्यासाठी आम्ही एक जबरदस्त टिप (Tips) सांगणार आहोत. डब्ब्यांवरचा चिवटपणा काढण्यासाठी तुम्हाला चहापत्तीचा वापर करावा लागणार आहे. तुम्ही चहा बनवून झालेल्या म्हणजेच वापरलेल्या चहापत्तीचा वापर केला पाहिजे.

Kitchen Hacks

त्याचबरोबर ही पद्धत वापरताना तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी नाही लागणारं आणि लवकर तुमचे सगळे डब्बे घासून पुसून स्वच्छ होतील. लोक वापरून झालेल्या चहापत्तीला फेकून देतात किंवा झाडांमध्ये टाकतात. पण याच चहापत्तीच्या वापरामुळे तुम्ही तुमच्या घरातील चिपचिप्या डब्यांची स्वच्छता राखू शकता. यासाठी चहा बनवून झाल्यानंतर उरलेल्या चहापत्तीची आवश्यकता भासते. एवढंच नाही तर तुम्ही रेगुलर भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी चहापत्तीचा वापर करू शकता.

अशा पद्धतीने साफ करा चिवट डागांचे डब्बे :

1. सर्वप्रथम चहा बनवून झाल्यानंतरची उरलेली चहापत्ती एका पातेल्यामध्ये टाकून पुन्हा उकळवून घ्या.

2. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे चहापत्तीचं पानी गाळून त्यामध्ये दोन चमचे लिक्विड डिशवॉशर टाका.

3. या पाण्यासोबत (Water) तुम्ही चिपचिप्या डब्यांना आणि भांड्यांना देऊ शकता.

4. ही जबरदस्त ट्रिक वापरून तुम्ही तुमची भांडी नव्यासारखीच चकाकू शकता.

5. चहापत्ती फक्त चिवट डब्बेच नाही तर सगळ्या प्रकारच्या भांड्यांना स्वच्छ करते. बऱ्याचदा आपल्या घरात काचेची भांडी असतात.

6. काचेची भांडी जास्त दिवस न वापरल्याने त्यावरती डाग पडतात आणि धूळ जमा होते.

7. हे डाग आणि धूळ साफ करण्यासाठी तुम्ही चहापत्तीचा वापर करू शकता.

8. यासाठी तुम्हाला आधी सारखंच चहाच पाणी गाळून घेऊन त्यामध्ये लिक्विड डिशवॉशर टाकून किंवा सबनाचे पाणी टाकून काचेची भांडी धुवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT