Kitchen Hacks : वाढत्या महागाईत स्वयंपाकघरातील गॅस वाचवायचा आहे ? तर 'या' 5 टिप्स ठरतील फायदेशीर

पाणी गरम करण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी गॅस खूप महत्वाचा भाग बनला आहे.
Kitchen Hacks
Kitchen HacksSaam Tv

Kitchen Hacks : प्रत्येकाच्या घरात रोज स्वयंपाक बनतो. रोज गॅसचा वापर केला जातो. पाणी गरम करण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी गॅस खूप महत्वाचा भाग बनला आहे. अशातच गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

अनेकांच्या घरामधला गॅस लवकर संपतो. परंतु गॅस लवकर संपू नये यासाठी आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून वाढत्या महागाईचा तुम्हाला त्रास देखील होणार नाही आणि तुम्ही तुमचा गॅस जास्त दिवस वापरू शकता.

Kitchen Hacks
Kitchen Hacks : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ? 'या' सोप्या टिप्सच्या मदतीने जाणून घ्या

1. प्रेशर कुकरचा वापर

दररोजच्या वाढत्या महागाईमुळे कुकिंग गॅसचे दर सुद्धा वाढले आहेत. अशातच सर्वात गरजेचं हे असत की आपण गॅस ची जास्त प्रमाणात बचत करावी. तुम्ही जास्त वेळ किचनमध्ये गॅसवरती जेवण बनवण्यास थांबत असाल. तर त्यापेक्षा चांगल होईल की तुम्ही प्रेशेर कुकरचा वापर केला पाहिजे.

2. जेवण झाकून बनवा

पातेल किंवा टोपामध्ये अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशातच तुम्ही डाळ, भात, बटाटे अशा प्रकारचे अनेक पदार्थ कुकरमध्ये बनवू शकतो. असं केल्याने तुम्ही तुमच्या गॅसची बचत करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जेवण झाकून बनवलं पाहिजे. जर तुम्ही टोपावर झाकण न ठेवता अन्न शिजवत असाल. तर तसं करणं तुम्हाला महागत पडू शकते. जेवण शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून शिकवलं तर तुमचं जेवण लवकर शिजत कारण की झाकण ठेवल्याने आतमध्ये वाफ निर्माण होते आणि त्यामुळे अन्न लवकर शिजते. अशातच तुम्ही झाकण न ठेवता अन्न शिजवल तर वाफ सगळी निघून जाते आणि अन्न शिजण्यास थोडा वेळ लागतो.

Kitchen Hacks
Kitchen HacksCanva

3. पाण्याचा वापर

तुम्ही अन्न (Food) शिजवताना पाण्याचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. तुम्ही योग्य प्रमाणात पाण्याचा वापर केला तर तुम्हाला अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार आणि तुमचा गॅस देखील वाचेल. जेवणामधील पाणी (water) सुकण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. त्याचबरोबर डाळ, राजमा, चणे, छोले अशा प्रकारच्या कडधान्यांना आधी भिजत ठेवा आणि नंतर कुकरमध्ये शिजवायला लावा.

4. जेवण बनवण्याची पूर्व तयारी करा

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण बनवताना सगळी सामग्री जवळ घेऊन ठेवा. बऱ्याचदा काही महिला गॅस पेटवतात आणि एकेक सामान शोधून जेवण बनवतात. असं केल्याने त्यांचा गॅस जास्त प्रमाणात वाया जातो. अगदी छोटीशी गोष्ट आहे पण बऱ्याच महिला त्यांच्या सवयींमुळे गॅस (Gas) वाया जातोय याकडे दुर्लक्ष करतात.

5. मंद आचेवर शिजवा

तुम्ही जेवण बनवताना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचं व्यवस्थित नियोजन करून जेवण बनवा. बरेच लोक गॅस वाचवण्यासाठी किंवा जेवण लवकर शिजवण्यासाठी गॅस फास्ट करतात. पण असं करणं अगदी चुकीचं आहे कारण अशाने तुमचा गॅस वयातर जातोच पण जेवण सुद्धा जळण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही कमी गॅसवरच जेवण बनवलं पाहिजे. त्याचबरोबर गॅसचं बर्नर देखील अधून मधून साफ केलं पाहिजे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com