Vivo V29e Phone Launch  Saam Tv
लाईफस्टाईल

Vivo V29e Phone Launch : विवोचा स्मार्टफोन लॉन्च! 50MP फ्रंट कॅमेरासह मिळणार अगदी वाजवी दरात, फीचर्स पाहा

Vivo V29e Specification : विवो V29e मध्ये 58.7-डिग्री कर्व्ह स्क्रीन असेल, जो सेगमेंटचा सर्वात स्लिम 3D कर्व्ह डिस्प्ले असेल.

कोमल दामुद्रे

Vivo V29e Features : आज भारतात Vivo V29e चा 5G फोन लॉन्च होणार आहे. या बाबतची माहिती कंपनीने दिली आहे. या फोनचा लॉन्च इव्हेंट पाहायचा असेल तर Vivo India च्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता.

टीझरनुसार, विवो V29e मध्ये 58.7-डिग्री कर्व्ह स्क्रीन असेल, जो सेगमेंटचा सर्वात स्लिम 3D कर्व्ह डिस्प्ले असेल. यात वक्र स्क्रीनसह रंग बदलणारे पॅनेल असेल. त्याची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे जाणून घेऊया याची किंमत व फीचर्स

1. Vivo V29e ची वैशिष्ट्ये:

ग्राहकांना या फोनमध्ये (Mobile) 6.78 इंच FHD + वक्री AMOLED पॅनल दिले जाऊ शकते. त्याचा रिफ्रेश दर 120Hz पर्यंत असण्याची अपेक्षा आहे. त्याची साइज (Size) ही 7.57 मिमी आणि वजन 180 ग्रॅम असेल. हा फोन 6nm स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट सह येऊ शकतो. तसेच हा फोन Android 13 सारखा असेल.

2. Vivo V29e ची अपेक्षित किंमत:

Vivo V29e दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्चिंग होऊ शकते. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येऊ शकतो, ज्याची किंमत 26,999 रुपये असू शकते. त्याच वेळी, त्याच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये असू शकते. यामध्ये निळा व लाल रंग असू शकतो.

3. बॅटरी आणि कॅमेरा:

या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. हे 44W चार्जिंगला सपोर्ट करू शकते. V29e मध्ये 64MP OIS प्राथमिक आणि 8MP लेन्स असू शकतात. डिव्हाइसमध्ये समोरील बाजूस 50MP कॅमेरा (Camera) असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर दिला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी, V29e वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.1 आणि चार्जिंग आणि डेटा एक्सचेंजसाठी USB टाइप-सी पोर्टसह येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT