व्हिगन आहार घेणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका २५% कमी असतो.
शाकाहारी लोकांमध्ये कॅन्सरचा धोका १२% कमी असतो.
कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका २१% ने कमी होतो.
तुम्ही कधी विचार केलाय का, की फक्त आपल्या ताटातून मांसाहारी पदार्थांना दूर ठेवलं तर तुम्ही गंभीर आजारांचा धोका कमी करू शकता? नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जे लोक शाकाहारी किंवा पूर्णपणे वनस्पती आधारित म्हणजेच व्हिगन आहार घेतात, त्यांच्यात मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका लक्षणीय कमी आढळला आहे.
अमेरिकेतील लोमा लिंडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या ‘सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्ट चर्च’च्या जवळपास 80 हजार लोकांवर तब्बल आठ वर्षे संशोधन केलं.
पूर्णपणे व्हिगन आहार घेणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका २५% कमी होता.
शाकाहारी लोकांमध्ये हा धोका १२% कमी होता.
दूध आणि अंडी खाणाऱ्यांमध्ये ब्लड कॅन्सरचा धोका देखील कमी दिसून आला.
कोलोरेक्टल कॅन्सर – २१% कमी
पोटाचा कॅन्सर – ४५% कमी
लिम्फोमा – २५% कमी
संशोधनातून हे देखील समोर आले की, मांस न खाणारे लोक साधारणपणे सडपातळ असतात, कमी अल्कोहोलचं सेवन करतात, धूम्रपान करत नाहीत आणि व्यायाम अधिक करतात. ते हार्मोनल औषधांचाही कमी वापर करतात. शास्त्रज्ञांनी हे घटक लक्षात घेऊन माहिती घेतली असली तरीही त्यांनी मान्य केलं की, जीवनशैलीचा परिणाम पूर्णपणे नाकारता येत नाही.
जगभरात ५० देशांपैकी २७ देशांमध्ये ५० वर्षांखालील लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर झपाट्याने वाढतो आहे. इंग्लंडमध्ये दरवर्षी ३.६% दराने वाढ होत असल्याची नोंद आहे तर अमेरिकेत जवळपास २% वार्षिक वाढ होताना दिसतेय.
पोटदुखी, सूज
सतत थकवा आणि श्वास घेण्यास त्रास
पोटात गाठ
मलात रक्त किंवा गुदद्वारातून रक्तस्राव
या संशोधनातून स्पष्ट होतंय की, मांस आणि डेअरी पदार्थ टाळून, वनस्पती-आधारित आहार म्हणजेच व्हिगन डाएट घेतल्यास आणि आरोग्यदायी जीवनशैली पाळून कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. म्हणून आजपासूनच आहारात भाज्या, डाळी, फळं आणि धान्य यांना अधिक समावेश करा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.