Vat Purnima 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेनिमित्त नववधूसाठी खास लूक; सौंदर्य पाहून पतीदेव होतील घायाळ

Vat Purnima 2024 Look Ideas : जर ही तुमची पहिलीच वटपौर्णिमा असेल आणि तुम्हाला तुमच्या पतीला जास्त इंप्रेस करायचं असेल तर तयार होताना या टिप्स फॉलो करा.

Ruchika Jadhav

आपल्या देशात सण-उत्सवाची एक अनोखी परंपरा आहे. जून महिना येताच आपल्या भारतीय सणांना सुरुवात होते. हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला मोठे महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी करते. यावर्षी ६ जून गुरुवारी वटपौर्णिमेचा सण आला आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा सण खूपच खास आणि प्रेमाचा असतो.

लग्नानंतर पहिल्या वटपौर्णिमेचा एक वेगळाच थाट असतो. या दिवशी महिला हौशीनं नटून-थटून वडाची पूजा करतात. नववधू आपल्या नवऱ्यासाठी उपवास करते आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. आता सर्वत्र याच सणाची लगबग पाहायला मिळत आहे. महिला वर्ग आपल्या साजश्रृंगाराच्या तयारीला लागल्या आहेत. आता जर ही तुमची पहिलीच वटपौर्णिमा असेल आणि तुम्हाला तुमच्या पतीला जास्त इंप्रेस करायचं असेल तर तयार होताना या टिप्स फॉलो करा.

लग्नात नेसलेली साडी /लेहंगा परिधान करा

लग्नाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही पहिल्या वटपौर्णिमेला लग्नाची साडी किंवा लेहंगा परिधान करू शकता. यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल. तुमचे सौंदर्य अजून खुलून येण्यासाठी लग्नातील दागिनेदेखील तुम्ही परिधान करू शकता.

१६ श्रृंगारांनी वाढेल तुमचं सौंदर्य

वटपौर्णिमेचे व्रत हे लग्न झालेल्या महिलांसाठी खूप महत्त्वाचे असते. या दिवशी पूर्ण १६ श्रृंगार करून व्रताची पूजा करावी. यामध्ये कुंकू, टिकली, हिरव्या बांगड्या आणि मंगळसूत्र याला खूप महत्त्व दिले जाते. हा १६ श्रृंगार करून तुम्ही नववधू सारख्या दिसाल.

नवऱ्याने दिलेले सुंदर गिफ्ट

पहिल्या वटपौर्णिमेला नवरा देखील आपल्या बायकोला छान असं गिफ्ट देतो. यामध्ये सुंदर कपडे आणि तिच्या आवडीचे दागिने असतात. तर तुम्ही तुमच्या 'अहों'नी दिलेले कपडे परिधान केलेत, तर या सणाला अजून चारचाँद लागतील.

हातावर मेहंदी काढणे

आपला लूक अजून सुंदर बनवण्यासाठी तुम्ही हातावर छान मेहंदी काढू शकता आणि त्यात तुमच्या नवऱ्याचे नाव आर्वजून लिहा. असे केल्याने पती देखील जास्त इंप्रेस होईल आणि आनंदी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Untitled May 06, 2026 02:29 am

SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

SCROLL FOR NEXT