Vat Purnima 2023 : वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा का करतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वटपौर्णिमा

आज महिला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा साजरी करत आहेत.

Vat Purnima 2023 | Social Media

वडाच्या झाडाची पूजा

सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.

Vat Purnima 2023 | Social Media

सुवासिनी महिला

पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात.

Vat Purnima 2023 | Social Media

पूजन

असं म्हटंले जाते, सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते,

Vat Purnima 2023 | Social Media

महत्त्व

वटपौर्णिमेत वडाच्या झाडाला जास्त महत्त्व आहे. सर्व सुवासिनी वडाच्या झाडाजवळ येऊन वटसावित्रीची पुजा करतात

Vat Purnima 2023 | Social Media

प्रतीक

माहितीनुसार, वडाच्या झाडांच्या मुळांमध्ये ब्रम्हा, झाडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिवाचा वास असतो. म्हणून हे झाड त्रिमुर्तीचे प्रतीक मानले जाते.

Vat Purnima 2023 | Social Media

वटपौर्णिमेचे व्रत...

तसेच वडाचे झाड हे मोठे दीर्घायुषी असते. आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठीच वटपौर्णिमेचे व्रत केले जाते.

Vat Purnima 2023 | Social Media

NEXT: Priya Bapat| पौर्णिमेचा चंद्र पाहिलात का?

येथे क्लिक करा....