SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

SRPF Paper Controversy: राज्यात पेपरफुटीची प्रकरणं काही नवी नाहीत. अशातच आता SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जातेय. एका खासगी क्लासेसच्या प्रश्नसंचामधील 81 प्रश्न जसेच्या तसे सरकारी परिक्षेत विचारल्यानं एकच गोंधळ उडालाय..नेमकं हे प्रकरण काय आहे? राज्यातील खासगी क्लासेस चालवणाऱ्यांचं भरती प्रक्रियेशी काही साटंलोटं आहे का?
SRPF recruitment exam faces controversy after multiple questions reportedly matched with a private coaching question bank.
SRPF recruitment exam faces controversy after multiple questions reportedly matched with a private coaching question bank.saam tv
Published On

ही प्रश्नपत्रिका कुठल्या दहावी किंवा बारावीच्या परीक्षेची नाही... तर ही प्रश्नपत्रिका आहे SRPFच्या पोलीस भरतीची... होय... आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच पाहा.. आता याच SRPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिकेमुळे राज्यात एकच खळबळ उडालीये. इतकंच नाहीतर आता पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या पॅनेलवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. दरम्यान, SRPFच्या पोलीस भरतीदरम्यान नेमकं काय घडलंय पाहूयात...

SRPF भरती परीक्षेत घोटाळा?

SRPF गट 5 दौंडमध्ये शिपाई पदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा शनिवारी इंदापुरात झाली

सराव प्रश्नसंच 10 या प्रश्नपत्रिकेतील सलग 85 प्रश्न SRPFच्या प्रश्नसंच A मध्ये जसेच्या तसे

प्रश्नांची क्रमवारी, पर्यायांमध्येही बदल नसल्याचं उघड

दरम्यान, SRPF भरतीच्या परीक्षेत आमचा कुठलाही रोल नसल्याचं 50 प्रश्नपत्रिका संच पुस्तकाच्या संपादकांनी स्पष्ट केलंय... विरोधकांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत SRPFचा पेपर कॉपी पेस्ट असल्याचं म्हटलंय...सरकारी भरतीतील भोंगळ कारभारामुळे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांवर अन्याय होतं असून ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशननं केलीये.

खरंतर, या सगळ्या प्रकारानंतर दौंडच्या SRPF भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय बळावलाय. एका खासगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचातील सलग 85 प्रश्न SRPFच्या भरतीसाठी विचारण्यात आले असतील तर खासगी क्लासेसचं पेपर सेट करणाऱ्यांशी साटंलोटं आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय. एकीकडे, राज्यात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत असताना दौंड SRPF भरती परीक्षेत जर अशा पद्धतीने घोळ होत असेल तर याची चौकशी करून कडक कारवाई करणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com