Tulsi Plant Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Tulsi Plant Vastu Tips: घरात पैसा टिकणार नाही, लक्ष्मीही होईल नाराज; चुकूनही तुळशीजवळ ठेवू नका या गोष्टी

तुळशीच्या जवळ काही गोष्टी ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घरातील पैसा टिकत नाही. जाणून घ्या कोणत्या चुका टाळाव्यात.

Manasvi Choudhary

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. फार पूर्वीपासून घरात तुळशीचे रोप लावले जाते. तुळस ही शुभ असते यामुळे घरामध्ये सुख- समृद्धी येते. नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने शुभ लाभ मिळतात. मात्र तुळशीचे योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. घरातील काही महत्त्वाच्या गोष्टींसाठीचे नियम वास्तुशास्त्रात दिले आहेत. या नियमांचं पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील लोक आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहतात. अशा घरावर देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहतो. 

वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप असणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीचे रोप घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करते. घरातील नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते.

  • तुळशीचे रोप ज्या ठिकाणी ठेवले आहे ती जागा स्वच्छ असावी.

  • तुळशीचे रोप जिथे ठेवले आहे तेथे शिवलिंग ठेवू नये. अनेकजण तुळशीत शिवलिंग ठेवतात असे करू नये.

  • तुळशीच्या जवळ कधीही चप्पल, बूट काढू नये तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो.

  • तुळशीच्या झाडाजवळ झाडू ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी कोपेल घरात गरीबी येईल.

  • वास्तुशास्त्रानुसार, एकादशी, रविवार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यादिवशी कधीही रात्री तुळशीची पाने तोडू नये.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

योगी-मोदींशी वैर नाही, पण...; जैन मुनी नीलेश चंद्रांचा भाजपवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: शरद पवार गट महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर?

Kale Khajoor Benefits: रोज सकाळी २ काळे खजूर खाण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

Maharashtra Election: सोलापुरात भाजपला डच्चू; शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; फॉर्म्युलाही ठरला

SCROLL FOR NEXT