Crystal Tortoise Saam TV
लाईफस्टाईल

Crystal Tortoise : क्रिस्टल कासव घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवताच होईल चमत्कार; धनसंपत्तीचा वर्षाव निश्चित

Astrology Vastu tips News : काही व्यक्ती घरात विविध धातूंचे कासव पाण्यात ठेवतात. त्यात क्रिस्टल कासव घरात किंवा ऑफीसमध्ये ठेवण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Ruchika Jadhav

कासवाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. असं म्हणतात की श्रीहरी विष्णूचे दहा अवतार आहेत त्यातील एक म्हणजे कासव. त्यामुळे अनेक व्यक्ती घरी कासव पाळण्याचा विचार करतात. मात्र कासव पाळण्याला बंदी आहे. त्यामुळे काही व्यक्ती घरात विविध धातूंचे कासव पाण्यात ठेवतात. त्यात क्रिस्टल कासव घरात किंवा ऑफीसमध्ये ठेवण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

अडचणी दूर

जर तुम्ही तुमच्या घरामध्ये क्रिस्टलचे कासव ठेवत असाल तर तुम्हाला अनुभवायला येईल की, तुमच्या आर्थिक समस्या सुटू लागल्यात. क्रिस्टल कासव घारत असल्याने घरातील ज्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या आहेत त्या दूर होतात. काही घरांमध्ये सतत आजारपण सुरू असतं, त्यांनी क्रिस्टल कासव घरात ठेवावा.

अर्थिक स्थैर्य

कितीही पैसा असला तरी काही घरांमध्ये सतत कडकी दिसते. काही ना काही कारणामुळे पैसा महिन्याच्या शेवटपर्यंत पुरत नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार अशा घरांमध्ये क्रिस्टल कासव असावा. काही ज्योतिश देखील व्यक्तींना घरात कासव ठेवण्याचा आणि त्याची सेवा करण्याचा सल्ला देतात.

कामात प्रगती

काही व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा क्रिस्टल कासव ठेवतात. त्यामुळे त्यांचे ऑफिसमधील सर्वांशी चांगेल रिलेशन बनते. काही व्यक्ती आपल्या ऑफिसमुळे फार तणावत असतात. काही केल्या त्यांचे काम निट होत नाही, भरपूर मेहनत घेऊन सुद्धा यश मिळत नाही. अशा व्यक्तींनी आपल्या कामात प्रगती व्हावी यासाठी क्रिस्टल कासव ठेवलं पाहिजे.

काय आहे कासवाची कथा

हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की, समुद्रमंथनाच्यावेळी जगाच्या रक्षणासाठी श्रीविष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता. त्यानंतरच समुद्रमंथन निर्विघ्न पार पडलं. त्यामुळे कासवाला अतीशय पवित्र मानले जाते. तसेच कासवावर धनदेवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद असतो, असं म्हटलं जातं.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. कासवाच्या फायद्यांचा आणि माहितीचा आम्ही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT