

पंचांग
शनिवारी,२० डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.
तिथी-अमावस्या ०७|१३
रास-धनु
नक्षत्र-मूळ
योग-गंडयोग
करण-नागकरण
दिनविशेष-अमावस्या वर्ज्य
मेष - जीवनामध्ये मिळालेल्या गोष्टींचे सोने करण्याचा आजचा दिवस आहे. अर्थात ज्या मिळणार आहेत त्या सहज गोष्टी आज मिळतील. आनंदाचे क्षण जीवनात येणार आहेत. गणेश उपासना आज विशेष फलदायी ठरेल.
वृषभ - आपली अर्थत्वाची असणारी रास आहे. पैशाचे आपल्याला विशेष महत्त्व आहेच. आज विशेष खटपट आणि धडपड पैसा मिळवण्यासाठी कराल.मात्र वाममार्गातून येणार नाही ना याची काळजी घ्या.
मिथुन- व्यवसायासाठी नवीन वाटा मिळतील. कदाचित एखादा नवीन व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू करण्याचा मानस असेल तर आज ती इच्छा पूर्ण होईल. कोर्टाच्या कामातही यश मिळेल.
कर्क - तब्येतीच्या तक्रारी त्रास देतील. विशेषतः मानसिक स्वास्थ खराब होईल. ताणतणाव यांनी भरलेला आजचा दिवस आहे. आजोळी मात्र प्रेम वाढेल. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.
सिंह - प्रेमामध्ये आज अहंकार बाळगू नका. आपल्या प्रियकराला प्रेयसीला समजून घेऊन पुढे गेलात तर दिवस चांगला आहे. काहीतरी महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडेल आणि ती तुम्ही निभावाला सुद्धा. रवी उपासना विशेष फलदायी ठरणार आहे.
कन्या - एखाद्या निर्णय घेताना गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित आयुष्यात दोन पर्याय पुढे उभे राहतील. त्यातून एकाचा निर्णय घेणे आज गरजेचे आहे. घर खरेदी,विक्री, शेतीवाडी मध्ये फायदा संभवतो आहे.
तुळ - बहिणीची विशेष माया आणि प्रेम आज आपल्याला लाभेल. जवळच्या व्यक्तीकडे सहकार्य मिळाल्यामुळे काम करण्यासाठी वेगळा हुरूप येईल. वैश्य प्रवृत्तीची असणारी आपली रास चिकाटीने आणि जिद्दीने कार्यरत रहाल.
वृश्चिक - विनाकारण एखाद्या गोष्टींमध्ये अडथळा संभावतो आहे. घरातील व्यक्तींना बरोबर घेऊन गेल्यास दिवस सुखकर राहील. पैशाची आवक जावक चांगली राहिल्यामुळे व्यवहार करताना दिलासा मिळेल.
धनु -"अर्धा घोडा आणि अर्धा माणूस" असे आपल्या राशीचे चिन्ह आहे. काही गोष्टींचे निर्णय पटकन घेतले जातात पण चुकीचे होतील. अशा गोष्टी आज होतील. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी केल्यास दिवस चांगला राहील. इतरांवर आपला प्रभाव राहील.
मकर - मी पण सोडून आज वागावे लागेल.योग्य ठिकाणी पैसा खर्च करा. नाहक खर्च करूच नका. अर्थात आपली चिकट आणि कंजूस असणारी रास विनाकारण पैसा खर्च झाला तर मनस्वास्थ्य ढासळेल. परदेश प्रवासाचे नियोजन होईल.
कुंभ - स्वतःबरोबर इतरांना सुद्धा महत्त्व देण्याचा आजचा दिवस आहे. जवळच्या लोकांकडून विविध मान मिळतील स्नेह भराने आलेला आजचा दिवस आहे. नव्याने परिचय होतील. विविध लाभ मिळतील.
मीन - राजकीय, सामाजिक क्षेत्र आज आपल्यासाठी नव्याने संधी घेऊन आलेले आहे.कामाच्या ठिकाणी सुद्धा आपलं कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन काहीतरी करण्याची उमेद घेऊन आज वावराल. वरिष्ठा व्यक्तीचे विशेष आशीर्वाद राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.