ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदूधर्मामध्ये नैसर्गिक गोष्टींना अनेकदा पूजलं जाते. देवाची पूजा करताना फुलं वाहिली जातात.
परंतु शास्त्रनुसार, पारिजाताच्या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. शास्त्रामध्ये परिजाताच्या फुलाचं संबंध समुद्रमंथनाशी केला जातो.
पारिजाताच्या फुलांची उत्पत्ती समुद्रमंथनावेळी झाली अशी मान्यता आहे. पारिजाजाची फुले रात्री 9 वाजल्या नंतर फुलू लागतात.
रात्रीच्या वेळी पारिजाताची फुले पांढरी शुभ्र असतात मात्र पहाटेच्या सूर्याची पहिले किरणे पाहताच त्यांचा रंग सोनेरी होण्यास सुरुवात होते.
भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा पराभव करून पारिजात वृक्ष पृथ्वीवर आणलं अशी देखील मान्यता आहे.
पारिजात फुलांचा वापर लक्ष्मीपूजनासाठी केला जातो. मात्र यावेळी त्याच फुलांचा वापर केला जातो जे हवेमुळे किंवा आपोआप झाडावरुन खाली पडतं.
देवी लक्ष्मी आणि पारिजाताची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली, त्यामुळे दोघांचे स्थान एकाच आहे आणि म्हणूनच देवी लक्ष्मीला हे फुल अतिशय प्रिय आहे अशी मान्यता आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.